शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या धावत्या ट्रकला आग

By admin | Updated: April 24, 2017 01:01 IST

कापूसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक धावत असताना आग लागली. अग्निशामक दलाने प्रयत्न करुनही आग आटोक्यात आली नाही.

कापसासह ट्रक जळून खाक : पिंपळगाव येथील घटनावरोरा : कापूसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक धावत असताना आग लागली. अग्निशामक दलाने प्रयत्न करुनही आग आटोक्यात आली नाही. आगीत ट्रकसह कापूस जळून भस्मसात झाला. ही घटना नागपूर - चंद्रपूर मार्गावरील पिंपळगाव शिवारात २२ एप्रिल रोजी रात्री घडली.एमपी ३७ जीए०७२८ या क्रमांकाचा ट्रक राजुरा येथून मध्य प्रदेशातील सतलापूर मंडीदीप येथे कापसाच्या गाठी घेवून जात होता. हा ट्रक पुढे निघाल्यावर नागपूर- चंद्रपूर मार्गावरील येन्सा गावानजीक ट्रकमधील कापसाला आग लागली. ही आग वाढत असल्याचे लक्षात येताच चालकाने पेटता ट्रक पिंपळगाव शिवारात रस्त्याच्या कडेला उभा केला. चालक व वाहक खाली उतरून पोलिसांना माहिती देण्याकरिता निघाले. ट्रक जवळत असल्याची माहिती मिळताच वरोरा पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रकची आग विझविण्यासाठी जीएमआर एनर्जी कंपनीच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु वाऱ्यामुळे आग आटोक्यात आली नाही. परिणामी कापसासह ट्रक जळून खाक झाला. (तालुका प्रतिनिधी)नागपूर-चंद्रपूर मार्गावरील वाहतूक प्रभावितकापसाचा ट्रकने पेट घेतल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभा होता. त्या बाजूने वाहतूक सुरु होती. त्यामुळे तेथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने चंद्रपूरवरुन नागपूरकडे जाणारी वाहतूक येन्सा गावाजवळ पोलिसांनी थांबविली. तसेच चंद्रपूरकडे जाणारी वाहतूक टेमुर्डा गावानजीक रोखण्यात आली. आगीच्या ज्वाळा कमी झाल्यानंतर एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली. तोपर्यंत काही काळ वाहतूक प्रभावित झाली होती.