शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

धाव, शिशिर... धाव.. !!

By admin | Updated: August 22, 2016 01:46 IST

चंद्रपुरातील शिशिर उर्फ ध्रृव सुभाष कामडी या साडेपाच वर्षे वयाच्या चिमुरड्याने रविवारी चंद्रपूरचे नाव पुन्हा देशभर पोहोचविले.

वाढली चंद्रपूरची शान : चिमुरड्या वयात झाला चार विक्रमांचा धनीगोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूर चंद्रपुरातील शिशिर उर्फ ध्रृव सुभाष कामडी या साडेपाच वर्षे वयाच्या चिमुरड्याने रविवारी चंद्रपूरचे नाव पुन्हा देशभर पोहोचविले. यापूर्वी २६ डिसेंबर २०१५ रोजी ६.३ मीटर उंचीखालून १० मिटर अंतर लिंबो स्केटिंगने पार करून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वत:च्या नावाचा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या शिशिरने इंडिया बुक आॅफ रेकार्डमधील स्केटिंगचा जुना विक्रम मोडीत काढून स्वत:चा नवा विक्रम प्रस्थापित केला. फास्टेस्ट क्वॉर्टर मॅराथॉन स्केटिंगअंतर्गत चंद्रपुरातील एमआयडीसी परिसरातील मार्गावर १०.५५ किलोमीटर लांबीचे अंतर अवघ्या ३४ मिनिटे ६ सेकंदात त्याने पार केले. इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये कोइम्बतूर येथील के. दर्शनी नामक बालिकेच्या नावाने १०.५५ किलोमीटर लांबीचे अंतर ४१.३ मिनिटांच्या आत कापण्याचा विक्रमाची नोंद होती. तिचा हा विक्रम शिशिरने मोडीत काढून चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.या विक्रमासाठी त्याने दुपारी ४ वाजता स्केटिंग केले. त्याच्या या विक्रमी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी चंद्रपुरातील जनता मोठ्या संख्येने गोळा झाली होती. अनेक लहान मुले हातात फ्लॅक्स घेवून त्याच्या धावण्याच्या मार्गावर प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थित होती. कुणी चॉकलेट आणले होते. तर कुणी गुलाबाची फुले त्याच्यासाठी आणली होती. लगतच्या मंडपात देशभक्तीपर गाणी वाजत होती. शेकडो माणसे त्याच्या कौतुकासाठी आली होती. मात्र शिशिरचे त्याकडे जराही लक्ष नव्हते. पायात स्केटिंगची चाके चढवून आणि डोक्यावर हेल्मेट घालून तो केव्हाचाच सज्ज होता. बरोबर ४ वाजून पाच मिनिटांनी इंडिया बुक आॅफ रेकॉर्डच्या वतीने वतीने आलेले पंच डॉ. मनोज तत्ववादी यांनी शिट्टी वाजूवन या विक्रमाला प्रारंभ करताक्षणी त्याने धावायला सुरुवात केली. एक किलोमीटर लांबीच्या चढउताराच्या रस्त्यावरून तो बेभानपणे धावत राहिला. स्कॉडकॉप्टरच्या माध्यमातून त्याच्या धावण्याचे शुटिंग अवकाशातून सुरू होते. मार्गात दुतर्फा उभे राहून शेकडोजण त्याला प्रोत्साहन देत होते. टाळ्या वाजवून त्याला जोश भरवित होते. पण तो बिनधास्त धावत राहीला. धावताना त्याला तिनदा तहान लागली. तरीही तो थांबला नाही. प्रशिक्षक धावतानाच पाण्याची बाटली त्याच्या हाती द्यायचे, क्षणासाठी न थांबता धावतच तो पाणी पिऊन पुन्हा नव्या जोमाने पुढे सरसावायचा. बघता बघता घड्याळाच्या काट्यांनी ३४ मिनीटे आणि ६ सेकंद पार केले आणि या क्षणीच त्याने १०.५५ किलोमीटरचे अंतर पार केले. प्रचंड जल्लोष, फटाक्यांची आतीशबाजी, हीप हीप हुर्यों, शाबार शाबास, वाह रे पठ्ठे..!अशा आरोळ्यांनी आसमंत निनादला. हा क्षण एक नवा विक्रम घेवून शिशिरच्या पुढे उभा ठाकला. प्रतिकुलतेवर मातयापूर्वी या विक्रमाची नोंद असलेल्या कोइम्बतूर येथील के. दर्शनी नामक बालिकेने हे अंतर सलगपणे १०.५५ किलोमीटरच्या टप्प्यात पार केले होते. मात्र चंद्रपुरात वाहतुकीच्या दृष्टीने एवढा लांब मोकळा मार्ग नसल्याने शिशिरला एक किलोमीटर लांबीच्या मार्गावरून पाच फेरे मारावे लागले. रस्ताही चढउताराचा होता. पावसाळ्याचे दिवस असले तरी सुर्यही चांगलाच तापला होता. फेरे घेताना त्याचा वेग मंदावायचा. तहानही लागायची. एक किलोमीटर लांबीच्या मार्गावरून पाच वेळा फेरे घेताना त्याचा मंदावणारा वेग आणि चढ उताराचा मार्ग यामुळे तो वेळेत अंतर पार करणार की, नाही, अशी अनेकांना धास्ती होती, मात्र या प्रतिकुलतेवर मात करीत त्याने अवघ्या ३४ मिनिटे आणि ६ सेकंदात हे अंतर पार केले. या मार्गावरून सराव करतानाही तो अनेक प्रसंगांना सामोरा गेला. एकदा तो अँब्युलन्सला धडकला. त्याच दिवशी एका भरधाव दुचाकीपुढेही तो आला होता. पण या प्रतिकुलतेवर मात करीत तो यशापर्यंत पोहचला.