शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

खडसंगीत बोगस डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:41 IST

मागील आठवड्यात ‘लोकमत’ने खडसंगीत सुरू असलेल्या स्टेरॉईड या आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या औषधांच्या काळाबाजाराची धक्कादायक माहिती उघडकीस आणली होती. खडसंगी गावातील खासगी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या डॉक्टरांपैकी निम्मे डाक्टर बोगस असल्याची खळबळजनक माहिती आरोग्य विभागाने एका माहिती अधिकार याचिकाकर्त्याला दिली आहे.

ठळक मुद्देमाहिती अधिकारातून उघड : आरोग्य विभागाचीच माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : मागील आठवड्यात ‘लोकमत’ने खडसंगीत सुरू असलेल्या स्टेरॉईड या आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या औषधांच्या काळाबाजाराची धक्कादायक माहिती उघडकीस आणली होती. खडसंगी गावातील खासगी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या डॉक्टरांपैकी निम्मे डाक्टर बोगस असल्याची खळबळजनक माहिती आरोग्य विभागाने एका माहिती अधिकार याचिकाकर्त्याला दिली आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या खडसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर परिसरातील ३२ गावातील ३४ हजार नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी आहे. यात ते अपयशी ठरत आहेत. खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील नोंदणीकृत व बिगर नोंदणीकृत (बोगस) डॉक्टरांची यादी एका व्यक्तीने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत आरोग्य विभागास मागितली होती. या अर्जदारास दिलेल्या माहितीत आरोग्य विभागाच्या खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत वैद्यकीय अधिकारी यांनी खडसंगी गावात सहा खासगी वैद्यकीय व्यावसायिक बोगस असल्याची माहिती आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीकृष्ण नन्नावरे यांनी माहितीच्या अधिकारात अर्जदाराला दिली आहे. सोबतच काही नामवंतही डॉक्टर गावात आहेत.रुग्ण कल्याण समिती नावालाचप्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत परिसरातील रुग्णांच्या कल्याणासाठी समिती स्थापण्यात आली आहे. जि. प.क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य या समितीचे अध्यक्ष असतात. या समितीत लोकप्रतिनिधींसह, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक व स्थानिक नागिरक यांचा समावेश आहे. खडसंगी गावातील निम्मे डॉक्टर हे बोगस आहेत.ही माहिती आरोग्य विभागासह रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांना माहिती असतानासुध्दा कित्येक वर्षांपासून हे डॉक्टर दवाखाने थाटून रुग्णांवर धोकादायक औषधांचा सर्रास वापर करतात. यामुळे रुग्णांच्या कल्याणासाठी स्थापण्यात आलेली समिती बोगस डॉक्टराविषयी अनभिज्ञ असल्याचे भासवून अशा डॉक्टरांची पाठराखण करीत असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.