शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओ’ खासगी बसगाड्यांविषयी अनभिज्ञ

By admin | Updated: August 14, 2015 01:21 IST

रस्त्यांवरुन धावणाऱ्या सर्व गाड्यांची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात असते. याच कार्यालयामार्फत खरेदीपासून विक्रीपर्यंतचे सर्व व्यवहार चालतात.

माहिती अधिकारातून उघड : मनोज पाल यांची पत्रकार परिषदचंद्रपूर : रस्त्यांवरुन धावणाऱ्या सर्व गाड्यांची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात असते. याच कार्यालयामार्फत खरेदीपासून विक्रीपर्यंतचे सर्व व्यवहार चालतात. मात्र जिल्ह्यातील रस्त्यांवरुन किती खासगी बसगाड्या धावतात, याबाबत हे कार्यालय अनभिज्ञ असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले, असे शिवसेनेचे पदाधिकारी मनोज पाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.चंद्रपूर- गडचिरोली, चंद्रपूर- चिमूर आणि चंद्रपूर- नागपूर या मार्गाने खासगी बसेस वाहतूक सुरू आहे. दररोज शेकडो खासगी बसगाड्या राजरोसपणे धावत आहेत. त्यामुळे या गाड्यांची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे असणे अपेक्षित आहे, मात्र शिवसेनचे मनोज पाल यांनी जिल्ह्यातील रस्त्यांवरुन किती वाहने धावतात, किती गाड्यांना आॅल इंडिया परवाना आहे, याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे माहिती अधिकारातून माहिती मागितली. तेव्हा या कार्यालयाने किती खासगी बसगाड्या धावतात, याची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. तसेच आॅल इंडिया परवाना मुंबईच्या परिवहन आयुक्त कार्यालयाकडून दिला जातो. त्यामुळे किती गाड्यांना हा परवाना आहे. याबाबतची माहिती नसल्याचे सांगितले. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवरुन खासगी आणि अन्य वाहनांनी मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे. यासाठी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी जबाबदार आहेत. अवैध प्रवासी वाहतूक थांबविण्याबाबत अनेकदा निवेदन देण्यात आले. परंतु, त्या निवेदनाची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे निवेदनातून तक्रार केली आहे. येत्या काळात अवैध प्रवासी वाहतूक बंद न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याचे पाल यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)