शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

तपाळ पाणीपुरवठा योजनेचे १९ लाख रूपये थकित

By admin | Updated: August 14, 2015 01:18 IST

नागभीडसह अकरा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या तपाळ पाणीपुरवठा योजनेला वसुलीच्या समस्येने ग्रासले आहे.

नागभीड : नागभीडसह अकरा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या तपाळ पाणीपुरवठा योजनेला वसुलीच्या समस्येने ग्रासले आहे. या योजनेचे संबंधित ग्रामपंचायतीकडे १८ लाख ८४ हजार ५२० रूपयाची थकबाकी असल्याची माहिती आहे.१९९५ मध्ये युती शासन महाराष्ट्रात सत्तारूढ झाल्यानंतर या योजनेला मंजुरी मिळाली होती आणि या योजनेत नागभीड तालुक्यातील नागभीड, नवखळा, मौशी, ढोरपा, बाळापूर, देवटेक, चिकमारा, चिखलपरसोडी ही गावे तर ब्रह्मपुरी तालुक्यातील तपाळ, तारेगाव खुर्द आणि तोरगाव (बुज) या गावांचा समावेश करण्यात आला. युती शासनाच्या काळातच या योजनेचे काम पूर्ण करण्यात आले आणि १९९९ मध्ये या योजनेचे लोकार्पण करण्यात आले.या प्रादेशिक नळयोजनेतील ११ गावांकडे २०१४-१५ च्या आकडेवारीनुसार एकुण १ हजार २५९ खाजगी नळजोडण्यांची संख्या असून या नळजोडणीवर ९ लाख ६ हजार ४८० रूपये पाणीपट्टी आकारण्यात आली आहे. यात उल्लेखनीय बाब अशी की, नागभीड ग्रामपंचायतीअंतर्गत ४३७ खाजगी नळ योजण्या असून या जोडण्यांवर ३ लाख १४ हजार ६४० रुपयाची पाणी कर आकारणी करण्यात आली आहे. सदर प्रादेशिक नळयोजनेची दैनंदिन देखभाल व दुरूस्तीचे काम पाणीपट्टी वसुलीच्या आधारावर निर्धारीत आहे. असे असले तरी संबंधित ग्रामपंचायतीकडून पाहीजे त्या प्रमाणात वसुली होत नसल्याने दैनंदिन देखभाल आणि दुरूस्तीचे काम करताना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागासमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. योजनेचे विद्युत पंप बदलविण्याचे आणि शुद्धीकरण केंद्रातील काम करायचे म्हटले तर या कामासाठी ५ लाख रुपयाची आवश्यकता आहे. परंतु, संबंधीत ग्रामपंचायतीकडून पाहीजे त्या प्रमाणात वसुली होत नसल्याने दुरूस्तीचे काम हाती घेताना उपविभागाला विचारच करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार २०१४-१५ आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा विचार केला तर १८ लाख ८४ हजार ५२० या रकमेपैकी फक्त ३ लाख ५ हजार रुपयाची वसुली उपविभागाला प्राप्त झाली. याचा अर्थ १५ लाख ७९ हजार ५२० रूपये संबंधित ग्रामपंचायतीकडे थकीत आहेत. त्यातल्या त्यात नागभीड ग्रामपंचायतीकडे ५ लाख २९ हजार २८० रुपयाची थकबाकी आहे. (तालुका प्रतिनिधी)