शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा पोलिसांची भूमिका संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 23:08 IST

वरोरा-नागपूर महामार्गावर जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाने प्रकाश मेश्राम या पोलीस शिपायाचा कर्तव्य बजावत असताना नाहक बळी घेतला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मात्र या घटनेबाबत पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीवरून वरोरा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागत आहे. या प्रश्नांचा उलगडा वरिष्ठ पोलीस अधिकारी करतील काय, असा प्रश्न इमाने-इतबारे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसह जनतेला पडला आहे.

ठळक मुद्देशिपायाला चिरडल्याचे प्रकरण : घटनेनंतर अनेक प्रश्न

राजेश भोजेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरोरा-नागपूर महामार्गावर जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाने प्रकाश मेश्राम या पोलीस शिपायाचा कर्तव्य बजावत असताना नाहक बळी घेतला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मात्र या घटनेबाबत पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीवरून वरोरा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागत आहे. या प्रश्नांचा उलगडा वरिष्ठ पोलीस अधिकारी करतील काय, असा प्रश्न इमाने-इतबारे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसह जनतेला पडला आहे.पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या घटनाक्रमात जनावरे तस्करी करणारे वाहने वणीकडून भरधाव येत होती, असे नमुद केले. मग ही जनावरे नेमकी कुठून आणली? कोणाकडून ती खरेदी केली, याचा शोध पोलीस प्रशासन घेईल काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.वणीकडून ही वाहने वरोरा मार्गे नागपूरकडे भरधाव जात होती. त्यांना तैनात पोलीस कर्मचाऱ्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केल्याची बाबही पोलिसांनी दिलेल्या घटनाक्रमात नमुद आहे. मात्र ती वाहने न थांबल्यामुळे प्रभारी अधिकाऱ्यांना माहिती दिल्याचे म्हटले आहे. पोलीस तैनात होते तर ते कोणत्या कारणाने, ही बाबही येथे लक्षात घेण्यासारखी आहे. ती वाहने सुसाट वेगाने पुढे निघाली. या वाहनाने खांबाडा येथे डोळ्यात तेल टाकून कर्तव्य बजावत असलेले शिपाई प्रकाश मेश्राम यांना चिरडून त्यांचा नाहक बळी घेतला. पोलिसांनी याप्रकरणात घटनेपूर्वीपर्यंत दिलेला एकूणच घटनाक्रम संशयाला घ्यायला लावणारा आहे. याची सखोल चौकशी केल्यास वास्तव पुढे येईल, असे काही पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.जनावरे वाहनात नेमकी कुठून कोंबली?सदर घटनेतील दोन्ही वाहनांची वणीकडे जाताना वरोरा टोल नाक्यावर ७ वाजून २७ मिनिट २३ सेकंद व ७ वाजून २७ मिनिट ५६ सेकंदाला नोंद झाली आहे. याचाच अर्थ यानंतरच्या तीन तासांमध्ये सारेकाही घडले आहे. ती वाहने जनावरे घेण्यासाठी वणीकडे गेली असेल. नंतर ती जनावरे वाहनात कोंबून पुन्हा नागपूरच्या दिशेने निघाली असेल. वाहने जेव्हा टोल नाक्यावरून वणीकडे जात होती. तेव्हा त्या वाहनांमध्ये जनावरे नव्हती, असे पोलिसांनी दिलेल्या घटनाक्रमावरून लक्षात येते. मग ही वाहने वणीकडे नेमकी कुठे गेली. ती जिथे गेली तिथपर्यंत त्या वाहनांना पोहचायला लागलेला वेळ आणि ती रिकामी असेल तर वाहनांमध्ये जनावरे कोंंबून भरायला लागलेला वेळ नेमका किती. ती जनावरे कोणाकडून खरेदी केली. याचा शोध पोलिसांनी घेणे गरजेचे आहे.ती जनावरे कुठे नेली जात होती?जनावरांची तस्करी वणीकडून नागपूरकडे होत असेल, तर ती जनावरे नेमकी कुठे नेली जात होती आणि कशासाठी, याचे उत्तर वरोरा पोलिसांकडून अपेक्षित नाही ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शोधण्याची गरज या घटनेने पुढे आली आहे. आजवर नागपूरकडून वरोरामार्गे जनावरांची तस्करी झाल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहे. परंतु वणीकडून नागपूरकडे जनावरांची तस्करी होत असल्याची ही पहिलीच घटना असून याबाबत जनता साशंक आहे. या प्रकरणाचा शोध लावून या घटनेत नाहक बळी ठरलेले शिपाई प्रकाश मेश्राम यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याची मागणी या घटनेने धास्तावलेले पोलीस शिपाई दबक्या आवाजात करीत आहेत.