शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक विकासासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:09 IST

शिक्षक हे विद्यार्थी घडवत असतात. विद्यार्थ्यांच्या विकासामुळेच सर्व देशाचा विकास होत असतो. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.

ठळक मुद्देरक्तदान शिबिर : पुरोगामी शिक्षक समितीचे अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षक हे विद्यार्थी घडवत असतात. विद्यार्थ्यांच्या विकासामुळेच सर्व देशाचा विकास होत असतो. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात नुकतेच पार पडले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्यप्रमुख सल्लागार आर. जी. भानारकर होते. यावेळी आ. नाना श्यामकुळे, जि. प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, सावली पं. स. च्या सभापती छायाताई शेंडे, रवींद्र बोलीवार, सुमन कोलगंटीवार, नारायण कोटकर, विजय भोगेकर, अल्का ठाकरे, शालिनी देशपांडे, दीपक वर्हेकर, ओम साळवे, सुनीता इटनकर, हरीश ससनकर यांची उपस्थिती होती.पहिल्या सत्रात सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शैक्षणिक परिसंवादात प्रशांत आर्वे यांनी ‘शिक्षणाला सामोरे जाताना’ या विषयावर मत व्यक्त केले. शैक्षणिक व सामाजिक कार्ये या विषयावर अल्का ठाकरे यांनी तर प्रास्ताविक व अहवाल वाचन हरीश ससनकर केले.अधिवेशनात जिल्ह्यातील १५ तालुक्यातील १५ उपक्रमशील शिक्षकांना आबासाहेब पाटील शिक्षक गौरव पुरस्कार, दोन शिक्षकांना आर.जी. भानारकर शिक्षक संघटक पुरस्कार, सुधीर कुंभारे यांना पीडी दादा कदम कला क्रीडा गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केले.