शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत रस्त्यांची डागडूजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:48 IST

गोंडपिपरी सार्वजनिक बांधकाम उपविगाच्या कार्यक्षेत्रातील कोठारी-तोहोगाव-लाठी अनेक रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देलाखोंचा निधी वाया : सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप

आॅनलाईन लोकमतकोठारी : गोंडपिपरी सार्वजनिक बांधकाम उपविगाच्या कार्यक्षेत्रातील कोठारी-तोहोगाव-लाठी अनेक रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दर सहा महिन्यांत डागडूजी केल्या जात असल्याने हा निधी वाया जात आहे, असा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत.कोठारी परिसरात काही वर्षांपासून लोकप्रतिनिधींचे लक्ष होते. त्यामुळे रस्त्याकडे त्यांचे विशेष लक्ष होते. रस्त्यांची नेहमी डागडूजी केली जात होती. कोठारी ते लाठी ३५ किमी लांबीच्या रस्त्याचा पुरता बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. गिट्टी, मुरूम विखुरले. वाहनधारक व पायदळ जाणाºयांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. चारचाकी व दुचाकी वाहन चालकांना तारेवरची कसरत करून वाहन चालवावे लागते. विशेष म्हणजे, परिसरातील अनेक रस्त्यांचे खड्डे सहा महिन्यांनी बुजविले जातात. त्यावर लाखो रुपयांची उधळपट्टी होते. परंतु, अधिकाºयांच्या नाकर्तेपणा व खाबुगिरीने कंत्राटदार मालामाल झाले आहेत. पण, रस्त्यांची स्थिती सुधारली नाही. संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन गैरव्यवहार बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.झुडुपांनी वेढलेला रस्ताकोठारी-लाठी मार्ग संपूर्णत: उखडला आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून डांबरीकरण नाहीसे झाले. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने झुडूपांच्या रांगा आहेत. झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या वळणावरुन जाताना अपघाताची शक्यता आहे. संबंधित विभागाने ही झाडे तोडून रस्ता मोकळा करावा.कारवाईची मागणीकोठारी-लाठी या रस्त्यावर दर सहा महिन्यांनी खड्डे बुजविले जाते. मात्र, स्थिती जैसे थे आहे. डांबरीकरण तसेच झुडूपे कापण्याचे काम यापूर्वीही झाले होते. या खर्चाची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील जनता करीत आहे.