शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

डांबर कंपन्यांच्या शटडाऊनमुळे राज्यातील रस्ते बांधकामाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 12:05 IST

मंजूर बांधकामे मार्च एडींगमध्ये पूर्ण करण्याची प्रशासकीय घाई सुरू असताना शासन अंगीकृत एचपीसीएल व बीपीसीएल कंपन्यांनी क्लिनिंगसाठी शटडाऊन केले. यामुळे डांबर पुरवठा बंद झाला असून राज्यातील रस्ते बांधकामाला ब्रेक लागला आहे.

ठळक मुद्दे स्थानिक स्वराज्य संस्थानांही फटकापुरवठा ठप्प

राजेश मडावीचंद्रपूर : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्यात ३ हजार ९०० किमी पेक्षा अधिक लांबीचे रस्ते बांधकामाला केंद्र सरकारने मंजुरी दिली तर दुसरीकडे सर्वजनिक बांधकाम विभागानेही निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ग्रामीण भागातील शेकडो किमी रस्त्यांची कामे हाती घेतली. मंजूर बांधकामे मार्च एडींगमध्ये पूर्ण करण्याची प्रशासकीय घाई सुरू असताना शासन अंगीकृत एचपीसीएल व बीपीसीएल कंपन्यांनी क्लिनिंगसाठी शटडाऊन केले. यामुळे डांबर पुरवठा बंद झाला असून राज्यातील रस्ते बांधकामाला ब्रेक लागला आहे.प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत २०१६-१७ मध्ये १ हजार ९०० किमी अंतराचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट राज्याला मिळाले होते. यापैकी ८९१ किमी रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले. याशिवाय केंद्राने १ हजार ९ किमी अंतराचे महामार्ग बांधकामासाठी मंजूरी दिली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने आपआपल्या जिल्ह्यांमध्ये तालुका व जिल्हास्थळाला जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचे कामे सुरू केली. याकरिता खडी व डांबरचा वापर केला जातो. रस्ते बांधकामासाठी खासगी कंपन्यांकडून डांबर विकत घेण्याला केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने मनाई केली आहे. यामुळे केंद्र शासन अंगीकृत एचपीसीएल (हिंदूस्थान पेट्रोलियम कार्पोशन कंपनी लि.) आणि बीपीसीएल (भारत पेट्रोलियम कार्पोशन कंपनी लि.) या दोन कंपन्यांकडूनच राज्य सरकाराला डांबर खरेदी करावी लागते. मार्च एडींग लक्षात घेऊ न बांधकाम विभागाने राज्यातील गावखेड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे सुरू केली. शिवाय, जिल्हा परिषद, महानगर पालिका व नगरपरिषदांकडून रस्त्यांची कामे केली जात आहे. मात्र, डांबर उत्पादक कंपन्यांनी याच महिन्यात अचानक शटडाऊन केल्याने पुरवठा ठप्प झाला. परिणामी, डांबरअभावी राज्यातील शेकडो किमी रस्त्यांची कामे ठप्पे झाली. चंद्रपुरातीलही रस्ते बांधकाम थंडावल्याचे दिसून येत आहे.अधिकारी गुंतले निवडणुकीतसार्वजनिक बांधकाम विभागातील शेकडो अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लोकसभा निवडणुकीसाठी झाल्या आहेत. सध्या निवडणूक आयोगाकडून अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची कामे सुरू आहेत. डांबर पुरवठा होत नसल्याने कामे ठप्प असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना मान्य केले. पण आचारसंहिता असल्याने सांगून यावर अधिक बोलण्यास नकार दिला.रस्त्यांच्या किंमती वाढणारज्या रस्त्यांची बांधकामे सुरू आहेत. याचा आचारसंहितेशी काही संबंध नाही. ही कामे मार्च महिन्यातच पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. यामुळे विहित मुदतीत बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक आहे. पण, डांबर नसल्याने कामे थंडावली. यावर तोडगा निघाला नाही तर रस्त्यांच्या किंमती वाढून आर्थिक फटका बसेल. अधिकारी हे मान्य करणार का, याची भीती आहे.-शंकर किरणापुरे, कंत्राटदार, चंद्रपूर

टॅग्स :Governmentसरकार