लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ६ ते १२ मार्च दरम्यान नाशिक ते मुंबई असा ३० हजार शेतकऱ्यांचा पायी लॉंग मार्च काढण्यात आला होता. या लॉंग मार्चमुळे महाराष्ट्रासह संपुर्ण भारतात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चर्चा झाली. नाशिक ते मुंबई असा २०० किलोमीटरच्या अत्यंत अखतर प्रवास करत धडकलेल्या मोर्चेकऱ्यांना शासनाने आश्वासन देवून माघारी पाठविले. मात्र अद्यापही आश्वासनानुसार कार्यवाहीला सुरूवात झाली नसल्याने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेला दिला आहे.मोर्चेकरी किसान सभेच्या मागण्या मान्य करीत वनजमिनीचे मालकी हक्क सहा महिण्यात देणार, शेतकरी कर्जमाफीच्या अटी शिथील करणार, कर्जमाफीसाठी २००१ पासून लाभ मिळणार, कृषिमुल्य आयोगावर किसान सभेचे सदस्य घेणार, संजय गांधी निराधार योजनेतील मानधनात वाढ करणार आदी मागण्या लेखी रूपात मान्य केल्या होत्या. या आश्वासनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करून सर्व जबरानजोत कास्तकारांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, बिगर आदिवासी करीता असलेली तीन पिढ्याची अट रद्द करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या काळात किसान सभेच्या नेतृत्वात सर्व जबरानजोत कास्तकार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा किसान सभेचे अध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे यांनी दिला आहे.किसान सभेच्या कार्यकर्त्यांची सभा मनोहर कोवे यांच्या अध्यक्षेखाली भानापेठ येथे पार पडली. सभेला गणपत लेनगुरे, शरद कोकोडे, विठ्ठल लोनबले, विलास बावणे, कमलाबाई रामटेके, सुखदेव मोहुर्ले, मोरेश्वर रामटेके, गजानन वाटगुरे, शंकर कोटरंगे, चोरगावच्या माजी सरपंच सुलोचना कोकोडे यांच्यासह किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
जबरानजोत कास्तकार उतरणार रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:15 IST
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ६ ते १२ मार्च दरम्यान नाशिक ते मुंबई असा ३० हजार शेतकºयांचा पायी लॉंग मार्च काढण्यात आला होता.
जबरानजोत कास्तकार उतरणार रस्त्यावर
ठळक मुद्देआश्वासनांची पूर्तता करावी : किसान सभेची चंद्रपुरात सभा