शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते विकास कामांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 23:03 IST

नक्षलग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील महामार्गासह सहा हजार कोटींच्या रस्ते विकास कामांना उच्चस्तरीय बैठकीत विविध मंजुरी देण्यात आली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचा समावेश आहे. या कामांना गती येणार असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.

ठळक मुद्देहंसराज अहीर : बैठकीत दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नक्षलग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील महामार्गासह सहा हजार कोटींच्या रस्ते विकास कामांना उच्चस्तरीय बैठकीत विविध मंजुरी देण्यात आली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचा समावेश आहे. या कामांना गती येणार असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी परिवहन भवन येथे केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, आ. नाना श्यामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, वणीचे आ. रेड्डी तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील रस्ते विकास कामांची आढावा बैठक झाली.तीनही जिल्ह्यांतील ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत’ बांधण्यात येणारे आठ महामार्ग, ‘अभियांत्रिकी, खरेदी व बांधकाम(ईपिसी) कार्यक्रमांतर्गत’ बांधण्यात येणारे नऊ रस्ते आणि ‘केंद्रिय रस्ते निधीतून’ करण्यात येणाऱ्या २२ कामांचा आढावा घेण्यात आला. रस्ते विकास कामांसंदर्भातील विविध मंजुरी देण्यात आल्या. तसेच या कामांसाठी आवश्यक असणारी वन विभागाची मंजुरी व रस्ते बांधकामांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे ना. अहीर यांनी यावेळी सांगितले.तीनही जिल्ह्यांतील रस्त्यांचे विकास कामे अंतिम टप्प्यात असून येत्या तीन महिन्यात विविध कामांचे उद्घाटनही होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.बंधारा व पुलाचा प्रायोगिक प्रकल्पकेंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने ‘वणी ते वरोरा’ महामार्गादरम्यान वर्धा नदीवर ‘बंधारा व पूल’ बांधण्याचा प्रायोगिक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या संदर्भातही मंगळवारी चर्चा झाली. या पुलाच्या माध्यमातून वाहतूक व जलसंधारणाचे उत्तम कार्य होऊ शकते व हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर भागांमध्ये याचे अनुकरण करण्यात येईल, असा चर्चेचा सूर होता.बाबुपेठ उड्डाणपुलाबाबत चर्चाचंद्रपूर शहारात ३५० कोटी रुपये खर्चून बाबुपेठ रेल्वे क्रासींगवर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या बांधकामाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. याशिवाय अन्य १० कामांचाही आढावा घेण्यात आला.महामार्गांचा घेतला आढावामंगळवारी झालेल्या बैठकीत वणी ते वरोरा या ९३० क्रमांकाच्या १८ कि.मी., ब्राह्मणी-राजुरा-वरुड- देवरापूर या ३० कि.मी व राजुरा-कोरपना-आदिलाबाद या ५७ कि.मी. लांबीच्या महामार्गांचा आढावा घेण्यात आला.