शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:46 IST

चंद्रपूर जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात जाण्याकरिता वर्धा नदीवरील मार्डा गावाजवळ बंधारा बांधण्यात आला आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात तसेच यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. परंतु वरोरा ते मार्डा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : चंद्रपूर जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात जाण्याकरिता वर्धा नदीवरील मार्डा गावाजवळ बंधारा बांधण्यात आला आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात तसेच यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. परंतु वरोरा ते मार्डा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीमधून वर्धा नदी वाहते. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांना वरोरा बाजार पेठ जवळ पडते. परंतु वर्धा नदीवर पूल नसल्याने आजपर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक वरोरा शहराकडे फारसे येत नव्हते. काही वर्षापूर्वी वरोरा तालुक्यातील मार्डा गावाजवळ वर्धा नदीवर बंधारा बांधण्यात आला. या बंधाºयावरुन हलके चार चाकी, दुचाकी व बैलबंडी सहज नेता येत असल्याने व वरोरा शहराचे अंतर कमी असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील हिवरा, मसरा, कामींडा, चोपन आदी गावांतील नागरिक विविध कामांसाठी वरोरा शहरात येतात. त्यामुळे सध्या वरोरा बाजारपेठेला सुगीचे दिवस आले आहे. मात्र वर्धा नदीच्या बंधाºयापासून तर वरोरा शहराजवळील माझरी रस्त्यापर्यंत सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. अनेक ठिकाणी रस्ता दबला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहन चालविने वाहन धारकांना कठीण झाले आहे.मार्डा रस्त्यालगत समाज भवन, नामांकित इंग्रजी माध्यमांची शाळा व तिन जिनिंग आहे. यासोबतच वरोरा परिसरातील नागरिकांच्या शेतात जाण्याकरिता या रस्त्याचा उपयोग केला जातो. मागील काही वर्षांपासून या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र याकडे संबंधित विभाग लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष परसला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक