शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणामुळे रस्ता बंद

By admin | Updated: June 9, 2017 00:54 IST

आवारपूर: अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने सीसीआर फंडाअंतर्गत मागील एक वर्षापूर्वी २५ लक्ष रुपये खर्च करुन

लोकमत न्यूज नेटवर्कआवारपूर : आवारपूर: अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने सीसीआर फंडाअंतर्गत मागील एक वर्षापूर्वी २५ लक्ष रुपये खर्च करुन वॉर्ड क्र. ४ मध्ये सांस्कृतिक भवन बांधले. मात्र या भवना मागील सरकारी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याचे अतिक्रमण काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहेत.सांस्कृतिक भवनासमोरील रस्त्यावरील वालदे यांच्या घरासमोर फूल व फळाचे झाडे लावली होती. त्याचा नागरिकांना त्रास नव्हता. मात्र ग्रामपंचायतने त्यांना नोटीस देवून रस्त्यावर लावलेली झाडे कापण्यास बाध्य केले. परंतु भवना मागे काही लोकांनी रस्त्यावरच्या नालीवर अतिक्रमण केले आहे. पावसाळ्यात या भागात नाली पूर्णपणे भरुन त्या पाण्याचा निचरा, काही नागरिकांच्या घरात होत असतो. नालीचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचते. त्यामुळे अनेक वर्षांपासून ही समस्या सोडविण्याची मांगणी होत आहेत. रस्त्यावर माती, टाकल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहेत. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता वाढली आहे. याकडे ग्रामपंचायत सदस्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. वॉर्डातील नागरिक आपसात वैर निर्माण होणार म्हणून गप्प आहेत. परंतु रस्त्यावर व नालीवर बांधकाम करणाऱ्याचे आपली भिंत पडेल, अशी भीतीसुद्धा त्यांना वाटत नाही. वेळीच लक्ष देवून पावसाळा व शाळा सुरु होण्याआधी हे अतिक्रमण काढण्याची वाट वॉर्डातील नागरिक पाहत आहेत.वॉर्ड क्र. ४ मधील अतिक्रमण अतिशय गंभीर आहे. अनेकदा अतिक्रमण काढण्याचा प्रयत्नसुद्धा झाला. परंतु प्रशासनाची साथ न लाभल्याने अतिक्रमण वाढत आहे. अतिक्रमण काढण्यास नागरिकांना सोयीचे होईल.- मारोती बुदे, सामाजिक कार्यकर्ते माझ्या घरासमोर मी तीन-चार फूल व फळांची झाडे लावली होती. परंतु ग्रामपंचायतने रस्त्यावर असलेली झाडे काढावी, अशी नोटीस पाठविली. त्यामुळे मी झाडे तत्काळ कापली. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावात अतिक्रमण आहे, हे त्यांना अजिबात दिसत नाही.- विक्की वाल्हे, नागरिक