शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पबाधित ५१ गावात आरओ वॉटर एटीएम मशिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 22:23 IST

चंद्र्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राअंतर्गत प्रभावित प्रकल्पग्रस्त गावांमधील नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी महाऔष्णिक केंद्राच्या व्यवस्थापनाकडून सामाजिक दायित्व निधीद्वारे आरओ वॉटर एटीएम लावण्यात येणार आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांमुळे ५१ प्रकल्पग्रस्त गावांमध्ये ४ कोटी ६४ लाख ८८ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : ४ कोटींचा निधी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्र्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राअंतर्गत प्रभावित प्रकल्पग्रस्त गावांमधील नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी महाऔष्णिक केंद्राच्या व्यवस्थापनाकडून सामाजिक दायित्व निधीद्वारे आरओ वॉटर एटीएम लावण्यात येणार आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांमुळे ५१ प्रकल्पग्रस्त गावांमध्ये ४ कोटी ६४ लाख ८८ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.चंद्रपूर महाऔष्णिक केंद्र शेकडो प्रकल्पग्रस्त नागरिकांनी पिण्यासाठी अशुद्ध पाणी मिळत असल्याच्या तक्रारी ना. अहीर यांच्याकडे केल्या होत्या. या पेयजलामुळे गावकऱ्यांना विविध जलजन्य आजारांचा सामना करावा लागत असल्याचेही ग्रामस्थांनी लक्षात आणून दिले. या प्रश्नाची दखल घेऊन ना. अहीर यांनी केंद्राच्या व्यवस्थापनासोबत बैठक घेतली. सीएसआर निधीतून या गावांमध्ये आरओ वॉटर एटीएम मशिनची उपलब्धता करावी, अशी सूचना केली होती.प्रभावित गावांच्या यादीसह सीटीपीएस व्यवस्थापनाकडे पत्र सादर करून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सीटीपीएस व्यवस्थापनाने प्रकल्पपिडित गावांची यादी महानिर्मिती मुख्यालयाला सादर केली होती. सीएसआर कार्यकारी मंडळाने सदर प्रस्ताव मंडळाच्या माध्यमातून सादर केला होता.या प्रस्तावाला संचालक मंडळाने एका ठरावाद्वारे मान्यता प्रदान केली. भद्रावती, चंद्र्रपूर तालुक्यातील सुमारे ५१ प्रकल्प प्रभावित गावांसाठी ४ कोटी ६४ लाख ८८ हजार रूपयांचे आरओ वॉटर एटीएमकरिता मंजूर केले. हे आरओ वॉटर एटीएम लवकरच कार्यान्वित केले जातील, असे सीटीपीएस व्यवस्थापनाने स्पष्ट केले. दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी जनसुविधेसाठी महत्त्वपूर्ण असलेले आरओ वॉटर एटीएम कार्यान्वित होतील, याकडे संबंधित अधिकाºयांनी लक्ष द्यावे, असे निर्देश दिले आहेत.