शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पेरलेली बियाणे करपण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 22:25 IST

मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाला सुरुवात झाली. राजुरा तालुक्यातील बहुतांश गावांत चार दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने कपाशीची लागवड तर काहींनी सोयाबीन पेरणी केली. परंतु आठवडाभरापासून पाऊस गायब झाल्याने दाणे जमिनीतून उगवण्यापूर्वीच कोमेजण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : राजुरा तालुक्यातील पेरण्या खोळंबल्या

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाला सुरुवात झाली. राजुरा तालुक्यातील बहुतांश गावांत चार दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने कपाशीची लागवड तर काहींनी सोयाबीन पेरणी केली. परंतु आठवडाभरापासून पाऊस गायब झाल्याने दाणे जमिनीतून उगवण्यापूर्वीच कोमेजण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.यावर्षी पाऊस भरपूर पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाला प्रारंभ झाला. तीन-चार दिवस चांगला पाऊस पडला. त्यामुळे शेतीकामांना चांगलाच वेग येऊन राजुरा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यावर्षी निसर्ग शेतकऱ्यांना साथ देईल असे वाटत असतानाच पावसाने खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच हुलकावणी दिल्याचे दिसून येत आहे.गेल्यावर्षी बोंडअळीच्या तडाख्याने शेतकरी हतबल झाला. उत्पादनापेक्षा खर्च अधिक झाल्याने शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला. यावर्षी उसनवारी व कर्ज काढून महागडे बियाणे जमिनीत टाकले. मात्र आठवडा उलटायला आला तरी पावसाचा पत्ता नाही. पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. पाऊस येईल, अशी आस शेतकऱ्यांना लागली.हवामान खात्याने २० जून नंतरच पाणी येईल, असा अंदाज वर्तविला आहे. कपाशीचे बीज अंकुरण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांनी विकत घेतलेले महागडे बियाणे मातीमोल होण्याचा धोका आहे. शेतकºयांना नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. हे शेतकऱ्यांचे धगधगते वास्तव आजही कायम आहे.निसर्गाने ऐनवेळी दगा दिल्याने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. यावर्षी शेतकºयांकडे बियाणे घ्यायला पैसे नव्हते. उसणवारी करुन पैशाची जुळवाजुळव केली. मात्र पाऊस असा अचानक बेपत्ता झाल्याने श्ेतकरी पूर्णत: निराश झाला आहे. खरीप हंगामाच्या ऐन तोंडावर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला.मृगाचा पाऊस पडल्याने दीर्घ उघडीप होईल. त्यामुळे पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. परंतु, हा संदेश शेतकºयांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे सुरुवातीला नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.दुबार पेरणीचे संकटमृगाचा पाऊस बरसल्यानंतर शेतकºयांनी लगबगीने कपासीची लागवड केली. त्यानंतर सलग चार दिवस बºयापैकी पाऊस आला. यावर्षी निसर्ग शेतकºयांना साथ देईल, असे वाटत असतानाच पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. पाऊस आला नाही, तर दुबार पेरणी करण्याची वेळ काही शेतकºयांवर येऊ शकते.उन्हाचा तळाखापेरणी करणारे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. तर दुसरीकडे प्रचंड उन्ह तापत असल्याने पेरलेल्या बियाण्यांचे काय होणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. पावसाने दीर्घ खंड दिल्यास बियाणे जमिनीत खराब होण्याची शक्यता आहे. दरम्यान बºयाच शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. पुरेसा पाऊस आल्यास पेरणीची लगबग सुरू होईल.