शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

निर्जीव लाकडात जीव फुंकतो ‘ऋषी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:39 IST

ग्रामीण भागात कलेचे अनेक उपासक आहेत. उच्च दर्जाची कला अंगी असुनही वाट्याला उपेक्षा येते. पण, गोंडपिपरी तालुक्यातील एका शिल्पकाराने कला सार्थकी लावून समाजभान जोपासले. निर्जीव लाकडात प्राण फुंकणाऱ्या ऋषीक वारलू मेश्राम यांच्या कलाकृतीने अनेकांना भुरळ घातली त्याने लाकडात साकारलेला अशोकस्तंभ सध्या चर्चेत आहे. हा कलावंत देवी, देवता, महापुरुष, निसर्ग देखावे लाकडावर हुबेहूब चितारतो.

ठळक मुद्देअशोकस्तंभ, देवदेवता, महापुरुषांची कोरली शिल्पे

लोकमत न्यूज नेटवर्कधाबा : ग्रामीण भागात कलेचे अनेक उपासक आहेत. उच्च दर्जाची कला अंगी असुनही वाट्याला उपेक्षा येते. पण, गोंडपिपरी तालुक्यातील एका शिल्पकाराने कला सार्थकी लावून समाजभान जोपासले. निर्जीव लाकडात प्राण फुंकणाऱ्या ऋषीक वारलू मेश्राम यांच्या कलाकृतीने अनेकांना भुरळ घातली त्याने लाकडात साकारलेला अशोकस्तंभ सध्या चर्चेत आहे. हा कलावंत देवी, देवता, महापुरुष, निसर्ग देखावे लाकडावर हुबेहूब चितारतो.हिवरा हे सधन शेतकऱ्यांने गाव म्हणून ओळखल्या जाते. ऋषीने साकारलेल्या कलाकृतीमुळे हे गाव प्रकाशझोतात आहे. ऋषी मेश्राम यांचे वडील वारलू मेश्राम हे सुतारकाम करतात. त्यामुळे बालपणापासून ऋषी लाकडावर हात फिरवू लागला होता. बघताबघता तो लाकडावर विविध कलाकृती उतरवू लागला. दरम्यान काष्ठ शिल्प कलेचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेतले.प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या कलेला बहर येऊ लागला. लाकडावर तो देवी, देवता, महापुरुषांची प्रतिमा व निसर्ग देखावे हुबेहुब कोरत असल्याने ग्राहकांचा ओढा वाढला आहे.लाकडी दरवाजा बनविताना त्यावर ग्राहकांना हवी ती कलाकृती ऋषी कोरत असतो. ऋषीच्च्या ामात भाऊ शांताराम यांची मोठी मदत असते. ऋषीची कला बघून धाबा ग्रामपंचायतचे सदस्य संतोष झाडे यांनी अशोकस्तंभाचे छायाचित्र दाखवून ते लाकडात कोरुन देण्यास सांगितले.अशोकस्तंभाची प्रतिमा लाकडात हुबेहुब उतरविण्याचे आव्हान ऋषीने सहजतेने पेलले. चार महिन्याच्या कालावधीत त्याने सहा फूटाचा देखणा लाकडी अशोकस्तंभ कोरला. या स्तंभावर चार सिंहाची मुखे असून त्याखालीच धम्मचक्र, हत्ती, सिंह, बैल, घोडा कोरला आहे. हे शिल्प नागरिकांच्या आकर्षणाचा विषय झाला. झाडे यांनी हा देखणा अशोकस्तंभ धाबा येथील सार्वजनिक बौद्ध विहाराला दान दिला आहे.