शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यलढ्याचा उदय गोंडवाना विचारक्रांतीतून

By admin | Updated: March 21, 2016 00:43 IST

भारतात इंग्रजांनी आपले साम्राज्य वाढविण्यास प्रारंभ केल्यानंतर त्याला प्रथम विरोध कोणी केला असेल ...

दिलीप सोळंके: चंद्रपूर येथे व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळाचंद्रपूर: भारतात इंग्रजांनी आपले साम्राज्य वाढविण्यास प्रारंभ केल्यानंतर त्याला प्रथम विरोध कोणी केला असेल तर तो या देशातील मूळ निवासी असलेल्या गोंडीयन समाजाने, समाजातील विचारवंत क्रांतिकारकांनी. मात्र प्रस्थापित जातीय व्यवस्थेने बरबटलेल्या लोकांनी त्यांचे क्रांती विचार लेखन स्वरूपात जगासमोर मांडले नाही. मूळ निवासी असलेल्या आदिवासी जमातीमधील विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक हा कमी असल्याचे प्रतिबिंबित करुन त्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र तो समाज ज्या परिसरात वास्तव्य करतो, तो ज्या नैसर्गिक वातावरणाशी जुळलेला आहे त्यांच्याशी समरस होणारी शिक्षणप्रणाली विकसित केली जात नाही, असे विचार प्रसिद्ध विचारवंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक दिलीप सोळंके यांनी व्यक्त केले.चंद्रपूर येथील वक्तृत्व कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था चंद्रपूर या संस्थेने चंद्रपूर येथे एक दिवसीय वक्तृत्व कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष लोकेश मडावी होते. प्रमुख पाहुणे म्हणून विचारवंत दिलीप सोळंके, सामाजिक कार्यकर्ते बापूराव मडावी, डॉ. सुजाता ताराम, प्राचार्य डॉ. विजय खंडाते, एसबीआय बल्लारपूरचे उपव्यवस्थापक अनंता टेकाम होते. ही कार्यशाळा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना व सामाजिक कार्यकर्त्यांना ऊर्जा निर्माण करुन देणारी असून समाजास दिशादर्शक ठरणारी आहे. जास्तीत जास्त जणांना याचा लाभ मिळावा, यासाठी अशा कार्यशाळेचे आयोजन करण्याचा मानस उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केला. कार्यशाळेचा व संस्थेचा उद्देश प्रास्ताविकेमधून रमेश कुंभरे यांनी मांडला. संचालन ज्योतीराम गावंडे तर आभार सुधाकर कन्नाके व विजय तोसाडे यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)