शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात बजावला मतदानाचा हक्क

By admin | Updated: July 10, 2016 00:35 IST

कोरपना तालुक्यातील २६ ग्रामपंचायत, राजुरा तालुक्यातील २४ ग्रामपंचायत तर जिवती तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज शनिवारी मतदान पार पडले.

ग्रामपंचायत निवडणूक : कोरपना-८२, राजुरा-७५ तर जिवती-६५ टक्के मतदानचंद्रपूर : कोरपना तालुक्यातील २६ ग्रामपंचायत, राजुरा तालुक्यातील २४ ग्रामपंचायत तर जिवती तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज शनिवारी मतदान पार पडले. यात कोरपना तालुक्यात ८२ टक्के, राजुरा तालुक्यात ७५ टक्के तर जिवती तालुक्यात ६५ टक्के मतदान झाले. शनिवारी दिवसभर संततधार पाऊस असल्यामुळे मतदानाची टक्केवारी निम्म्यावर जाईल, असे वाटत होते. मात्र भर पावसातही नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. जिवती : जिवती तालुक्यात एकूण २० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. एकूण ११७ जागेसाठी ४१३ उमेदवार रिंगणात होते. दिवसभर तालुक्यात पाऊस पडत असला तरी अधिकारी व कर्मचारी यांनी आपआपली जबाबदारी पार पडली. प्रारंभी सकाळी दोन-चार नागरिकच मतदान केंद्रावर जाताना दिसत होते. मात्र पाऊस उसंत घेणार नाही, हे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर पडणे सुरू केले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तालुक्यातील मतदान ४० टक्के होते. सायंकाळी अखेरपर्यंत ६५ टक्के मतदान झाले. कोरपना : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीकरिता मतदान पार पडले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाने मतदानाची तयारी केली. चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. कोरपना तालुक्यात निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती पेसा कायद्यांतर्गत येतात. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना, भाजप व शिवसेनासह पक्षांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे. बऱ्याच ठिकाणी पॅनल तयार करून निवडणुका लढविल्या जात आहे. या निवडणुकीत मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकतात, हे निकालाअंतीच स्पष्ट होणार आहे. शनिवारी सर्वच ग्रामपंचायतीमध्ये शांततेत मतदान पार पडले. तालुक्यात २२२ जागाकरिता ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत २९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.राजुरा : राजुरा तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. राजुरा तालुक्यात एकूण २४ ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. दरम्यान, आज शनिवारी मतदानाच्या दिवशीच दिवसभर पाऊस असल्याने नागरिकांना छत्र्या, रेनकोट घालूनच मतदानासाठी जावे लागले. सकाळी काही प्रमाणात मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली. मात्र दुपारच्या सुमारास अचानक गर्दी कमी झाली. यामुळे मतदानाची टक्केवारी घसरणार, असे शासकीय यंत्रणेला वाटत होते. मात्र दुपारनंतर पुन्हा मतदार बाहेर पडताना दिसून आले. सायंकाळी अखेरपर्यंत तालुक्यात ७५ टक्के मतदान झाले. (लोकमत चमू)नांदा येथे मशीनमध्ये बिघाड; काही काळ मतदान ठप्पनांदा येथे मशिनमध्ये बिघाड असल्याने काही वेळ नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. परंतु बिघाड दुरुस्त झाल्यानंतर पुर्ववत मतदान सुरू झाले. सर्वात मोठी हीच नांदा ग्रामपंचायत निवडणूक असून या ठिकाणी सर्वच पक्षानी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहे. तालुक्यातील परसोडा ग्रामपंचायत निवडणुकीवर मतदान करण्याकरिता गोविंदपुर येथील नागरिकांना येता आले नाही. परसोडा गावात जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरुन पाणी असल्याने गोविंदपुर येथील नागरिक मतदानापासून वंचित राहले.यासोबतच अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने तेथील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला नाही.फिरत्या पोलीस पथकाची मतदारांसोबत हुजतजिवती : जिवती तालुक्यातील २२ पैकी २० ग्रामपंचायतीची निवडणूक असून यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवाात आला. अगोदरच अतिसंवेदनशील असलेल्या या तालुक्यात व्यवस्थित मतदान व्हावे, यासाठी जिल्हाभरातील पोलीस बळ जिवतीत दाखल करण्यात आले. पण काही ठिकाणी पोलीसदादांकडून मतदारांसोबत हुजत घातल्याचे दिसून आले. नोकेवाडा ग्रा.पं.ची आज निवडणूक असून गावातील मतदार विष्णू खंडेकर हा जिवती येथे राहून पंचायत समितीची गाडी चालवितो. आज मतदान करण्यासाठी तो नोकेवाडा येथे आला असता फिरते पोलीस पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याने तु इथे कसा आला? तुझे इथे काय काम म्हणून हुज्जत घातली व मतदान करण्यास मज्जाव केला. या फिरत्या पोलीस पथकाने नोकेवाडा येथील मतदान केंद्रावर आपली गाडी थांबवून मतदारांवर दबाव टाकल्याचे गावकऱ्यांनी बोलून दाखविले.