शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांना डावलून धनदांडग्यांना घरकूल !

By admin | Updated: February 20, 2017 00:30 IST

अन्न, वस्त्र, निवारा या माणसांच्या मुलभूत गरजा असून देशातील गरीब जनतेला निवाऱ्याच्या सोयीसाठी घरकूल योजनेची निर्मिती करण्यात आली.

चौकशीची मागणी : जिल्ह्यात अनेक गावांतील प्रकार चंद्रपूर : अन्न, वस्त्र, निवारा या माणसांच्या मुलभूत गरजा असून देशातील गरीब जनतेला निवाऱ्याच्या सोयीसाठी घरकूल योजनेची निर्मिती करण्यात आली. घरकूल मिळण्यासाठी दारिद्रयरेषेखाली असणे अनिवार्य असताना दारिद्रयरेषेखालील जनगणना करताना गरिबांना डावलून धनदांडग्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गरीब जनतेला वगळून लखपतींना घरकूल योजनेचा लाभ मिळत असल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून होत आहे.दारिद्रयरेषेखालील नागरिकांची करण्यात आलेले जनगणना रद्द करून पुन्हा जनगणना करण्यात यावी, जेणेकरुन या योजनेत गरिबांना समाविष्ट होता येईल. ही बाब अनेकदा लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु गरिबांचा वाली कोण? हे अजूनही कोड्यात आहे. गरीब जनतेची ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी कोणताही अधिकारी पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळे गरीब जनतेला घरकूल योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.सन २००२ मध्ये दारिद्रयरेषेखालील जनतेची जनगणना करण्यात आली. ज्या कर्मचाऱ्यांना जनगणना करण्याचे काम देण्यात आले. त्यांनी गावातील घरी बसून वस्तुस्थिती न पाहता नियम, निकष बाजूला सारुन संपूर्ण गावाची जनगणना केली. त्यामुळे गरीब जनतेला वगळून धनदांंडग्या लोकांची नावे दारिद्रयरेषेखाली समाविष्ट करण्यात आले. सद्यास्थितीत पंतप्रधान घरकूल योजना सुरू आहे. यासाठी शासनाकडृून लाभ देण्याचसाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. मात्र यातही अनेकांना घरकूल मिळेल किंवा नाही, याची शाश्वती नाही. नगरपंचायत, महानगर पालिका व ग्रामपंचायत हद्दीत ही योजना राबविली जात आहे. मात्र यासाठी अनेक अटी लादण्यात आले आहेत. त्यामुळे सामन्य नागरिक या अटी पूर्ण करण्यात असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे गर्भश्रीमंताना मिळालेली घरकूले रद्द करावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे. काही गावातील ग्रामपंचायत येथे जाऊन दारिद्रयरेषेखालील घरकूल यादी मागितली असता त्यांना नकार दिल्याचा प्रकार घडला आहे. तुम्ही पंचायत समितीमध्ये चौकशी करा, असा सल्ला ग्रामपंचायत प्रशासनाने दिला. एकंदरीत २००२ च्या जनगणनेनुसार गरीब जनतेला डावलण्याचा मोठा प्रयत्न केला गेल्याने शासनाच्या घरकूल योजनेपासून मुकण्याची पाळी गरीब जनतेवर आली आहे. प्रशासनाने यात लक्ष घालून गरीब जनतेला वस्तुस्थिती पाहून घरकूल योनजेचा लाभ द्यावा, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)