शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दहा गावातील शेतीमध्ये येणार क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : पळसगाव- आमडी उपसा सिंचन योजनेसाठी केलेला संघर्ष फळाला आला. या योजनेच्या माध्यमातुन १० गावांतील ...

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : पळसगाव-आमडी सिंचन योजनेचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पळसगाव- आमडी उपसा सिंचन योजनेसाठी केलेला संघर्ष फळाला आला. या योजनेच्या माध्यमातुन १० गावांतील २ हजार ४६२ हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यातून हरित क्रांती होणार, अशी ग्वाही अर्थ व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचन सुविधा पुरविण्याच्या कामाच्या भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी सोमवारी जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा नेते प्रमोद कडू, जिल्हा परिषद सदस्य वैशाली बुध्दलवार, अ‍ॅड. हरीश गेडाम, बल्लारपूर तालुका भाजपाचे अध्यक्ष किशोर पंदिलवार, रमेश पिपरे, बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंद पोडे, उपसभापती इंदिरा पिपरे, पंचायत समिती सदस्य सोमेश्वर पदमगिरीवार, विद्या गेडाम आदी उपस्थित होते.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या योजनेच्या माध्यमातुन पीक पध्दतीही बदलेल. शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती आदींबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षणासाठी अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने शेतकरी प्रशिक्षण केंद्र्र उभारल्या जात आहे. मुल तालुक्यात दुग्ध व्यवसाय वाढावा त्यामाध्यमातुन श्वेतक्रांती व्हावी, यादृष्टीने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले.पाईपलाईनसाठी २३ कोटी मंजूरचांदा ते बांदा या योजनेअंतर्गत चिचाळा व लगतच्या गावांमध्ये पाईपलाईनद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी २३ कोटींचा निधी मंजूर केला. त्या कामालाही सुरूवात झाली आहे. माजी मालगुजारी तलावांच्या विशेष दुरूस्तींची कामे आपण पूर्णत्वास आणली आहे. हा मतदार संघ आरो युक्त मतदार संघ ठरावा यादृष्टीने आपण योजना आखली असून बल्लारपूर तालुक्यातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.सांसदीय कार्यावर ध्वनी चित्रफितउमरी पोतदार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले आहे. कळमना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधीची अडचण दूर झाली. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ९२ गावांमध्ये सधन शेतकरी प्रकल्प आपण राबवित आहोत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पळसगांव-आमडी उपसा सिंचन योजनेसाठी १९९६ पासून केलेल्या संसदीय संघर्षावर दृष्टिक्षेप टाकणाºया सिंचन संघर्ष या पुस्तिकेचे विमोचन चंदनसिंह चंदेल व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यासंबंधीची ध्वनी चित्रफित दाखविण्यात आली.