शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आढावा सभा पाणी पुरवठा विभागावर घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2016 01:10 IST

खासदार अशोक नेते आणि आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी येथे सोमवारी घेतलेली आढावा सभा पाणी पुरवठा विभागावर चांगलीच घसरली.

१५ दिवसांत काम पूर्ण करणारनागभीड: खासदार अशोक नेते आणि आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी येथे सोमवारी घेतलेली आढावा सभा पाणी पुरवठा विभागावर चांगलीच घसरली. अन्य विषयांवरसुद्धा गरमागरम चर्चा झाली. या आढावा सभेत १५ दिवसांत काम मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. पण ते खरोखरच शब्दाला किती जागतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.या सभेला जिल्हा परिषदेचे अर्थ सभापती ईश्वर मेश्राम, उपविभागीय अधिकारी उमेश काळे, नागभीडचे तहसीलदार समीर माने यांची व्यासपिठावर प्रामुख्याने उपस्थिती होती. या आढावा सभेत जवळपास सर्वच विभागाच्या कामांवर चर्चा करण्यात आली. नागभीड तालुका शेतकऱ्यांचा असुनही विहीरींसाठी केवळ १८६ अर्ज आलेत, अशी माहिती देण्यात आल्यानंतर यावर आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या योजनेत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी कसे होतील, यासाठी जनजागरण करण्यात यावे, अश्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यानंतर पाणी पुरवठा विभागाचा प्रश्न चर्चेत आला. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सोमकुंवर यांची यावेळी चांगलीच तारांबळ उडाली. वाढोणा, तेलीमेंढा, मोहाळी (मोकासा) व पाहार्णी येथील पाणी पुरवठा योजनांंनी या आढावा सभेत चांगलाच भाव खाल्ला. वाढोणा येथे पाणी पुरवठा योजना कार्यरत असूनही केवळ अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे वाढोणावासियांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मोहाळी येथील पाणी पुरवठा योजनेची एमबी गेल्या एक वर्षांपासून गायब आहे. तरीही अधिकारी साखर झोपेत आहेत. यावरून आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी चांगलेच धारेवर धरले. यावर वाढोण्याचे काम १५ दिवसांत पूर्ण केले जाईल. तसेच मोहाळीच्या एमबी त्वरित पूर्ण केल्या जाईल, असे यावेळी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नागभीड तालुक्यात बहुतेक योजना अपूर्ण आहेत. मोघम उत्तरे देऊ नका, अशी कान उघाडणीही खा. नेते यांच्याकडून यावेळी करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)