शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

इको-प्रोच्या किल्ला स्वच्छतेचा पालकमंत्र्यांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:19 IST

इको-प्रोच्या वतीने मागील ३३२ दिवसांपासून चंद्रपुरातील प्राचीन किल्ला व अवशेषांची स्वच्छता केली जात आहे. राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी इको-प्रोच्या या अभियानाला रविवारी भेट देऊन आढावा घेतला.

ठळक मुद्देकिल्ला स्वच्छता अभियानाचा ३३२ वा दिवस

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : इको-प्रोच्या वतीने मागील ३३२ दिवसांपासून चंद्रपुरातील प्राचीन किल्ला व अवशेषांची स्वच्छता केली जात आहे. राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी इको-प्रोच्या या अभियानाला रविवारी भेट देऊन आढावा घेतला.शहरातील ऐतिहासीक गोंडकालीन किल्ल्याची स्वच्छता अभियान १ मार्च २०१७ पासुन सुरू करण्यात आले असून रोज नियमित संस्थेच्या स्वंयसेवकांच्या मदतीने श्रमदानाच्या माध्यमातून किल्ले व परकोट स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.बगड खिडकी परिसरातील सर्वाधिक सुंदर असलेल्या बुरूज क्रमांक ४ मध्ये स्वच्छता सुरू असताना ना. सुधीर मुनगंटीवार तेथे आले. अभियानाची पाहणी केली. यादरम्यान गोंडराजांनी बांधलेला भक्कम आणि मजबुत किल्ला कसा दुरावस्थेत होता. आता स्वच्छतेनंतर यात कसा फरक पडला आहे, किल्ला स्वच्छता अभियान राबविण्यापूर्वी आणि नंतरची स्थिती दर्शविणारे छायाचित्र दाखवित किल्ला अभियानाची पालकमंत्र्यांना माहिती देण्यात आली. रामाळा तलाव पर्यटन विकास करताना किल्ल्यास लागून बांधण्यात आलेला रामाळा तलाव ते बगड खिडकी हा रस्ता वापरात नसल्याने मोठया प्रमाणात झुडपे वाढल्याने बंद झाला आहे. त्याची साफसफाई सुरू असून या रस्ताची पूर्वीप्रमाणे बांधकाम करण्याची गरज, शहरातील ऐतिहासीक पर्यटन विकासाच्या दृष्टीने हेरीटेज वॉक आयोजित करण्याची, किल्ल्यास लागून होत असलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम, आतील भागाचा वापर ‘पाथ वे’ व 'सायकल ट्रेक' म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा, अशी मागणी इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी पालकमंत्र्यांकडे केली.