शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षात ५.६० कोटींचा महसूल जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:37 IST

येथील तहसीलदार होळी यांनी अवैध रेती व इतर गौणखनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी विशेष पथकासह कारवाई करीत जानेवारी महिन्यापर्यंत तब्बल ५ कोटी ६० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे ९६ अवैध गौणखनिज वाहतूक प्रकरणात वाहनांवर कारवाई केली आहे.

ठळक मुद्देराजुरा तहसीलदारांची कारवाई : अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी दंड

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : येथील तहसीलदार होळी यांनी अवैध रेती व इतर गौणखनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी विशेष पथकासह कारवाई करीत जानेवारी महिन्यापर्यंत तब्बल ५ कोटी ६० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे ९६ अवैध गौणखनिज वाहतूक प्रकरणात वाहनांवर कारवाई केली आहे.मागील काही महिन्यांपासून रेती घाटाचे लिलाव रखडले आहे. त्यापूर्वीपासून राजुरा तालुक्यात नदी व नाल्यांमधून रेती चोरी इतरही गौण खनिज चोरीचे प्रकार सर्रास घडत होते. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात होता. दरम्यान, राजुराच्या तहसीलदारांनी अवैध रेती व इतर गौण खनिजाच्या चोरीवर आळा घालण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली. ही पथके रात्रदिवस नदी, नाले व खाणींच्या परिसरात नजर ठेवून असतात. भरारी पथकाद्वारे अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात असून, तपासणी अंती वाहतूक परवाना बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच वाहन सोडले जाते.मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी रेतीघाटांच्या लिलावाची मुदत संपली होती. त्यानंतरही काही वाहतूकदारांकडून रात्रीच्या सुमारास चोरीच्या मार्गाने रेती आणली जात असताना तहसील कार्यालयाच्या पथकाने अशा अनेक वाहनांवर दंड ठोठावून कारवाई केली आहे.सध्या जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु झाली असली तरी सर्वच घाटांचा लिलाव अजूनही झालेला नाही. त्यामुळे काही तस्कर नदी व नाल्यांमधील रेतीची तस्करी करीत आहेत. परंतु, राजुरा तालुक्यात सुरु असलेल्या धडक कारवाईमुळे त्यांच्यावर वचक बसला आहे.विरुर स्टेशन परिसरात सर्वात जास्त कारवायाराजुरा तालुक्यातील विरुर (स्टे) या भागातून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक केली जात असल्याने तहसीलदार होळी व त्यांनी गठित केलेल्या पथकाकडून या भागाकडे विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. विरुर स्टेशन हा परिसर महाराष्ट्र - तेलंगणाच्या सीमेलगत असल्याने व या परिसरात नदी-नाले असल्याने मोठ्या प्रमाणात गौणखनिज या भागात आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वात जास्त कारवाया या भागातच करण्यात आल्या आहे. महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईचे सत्र सुरु केल्यामुळेच रेती व इतर गौणखनिजाच्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.