शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

महसूल प्रशासनाने वसूल केला रेती तस्करांकडून एक कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

रेतीची वाहतूक तसेच खनन करण्यावर बंदी आहे. मात्र काही जण लपून वाहतूक करीत आहे. यांच्यावर कारवाई करण्यासाठी महसूल प्रशासनाने पथकाचे गठण केले आहे. पथकाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी काही रेती तस्करांनी पथकावर हल्ला केला. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. -निलेश गौंड, तहसीलदार, चंद्रपूर

ठळक मुद्देलिलावातून मिळविले २० लाख : विविध पाच प्रकरणात पोलिसात गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात रेतीची वाहतूक तसेच खनन करण्यावर निर्बंध असतानाही तस्कर रेती तस्करीकरून शासनाचा महसूल बुडवित आहे. दरम्यान, चंद्रपूर तहसील कार्यालयाच्या पथकाने मागील वर्षभरात विविध शंभरावर कारवाई करून तस्करांकडून तब्बल १ कोटी १७ हजार १५५ रुपयांचा दंड वसुल केला आहे. विशेष म्हणजे, विविध पाच घटनांमध्ये पोलिसात गुन्हेही दाखल करण्यात आले असून काही प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.रेती तस्करांना कायद्याचा धाक नसल्याचा प्रकार पुन्हा घडला आहे. बुधवारी जमनजट्टी परिसरात नायब तहसीलदार राजू धांडे यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे आता पूर्णपणे या तस्करांच्या मुसक्या आवळणे प्रशासनाला गरजेचे आहे.असे आहे प्रकरणचंद्रपूर तहसील कार्यालयाने २०१९-२० मध्ये ८७ प्रकरणी कारवाई केली. यातून ८० लाख २६ हजार ९५५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर २०२०-२१ मध्ये २३ प्रकरणामध्ये १९ लाख ९० हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.रेतीची वाहतूक तसेच खनन करण्यावर बंदी आहे. मात्र काही जण लपून वाहतूक करीत आहे. यांच्यावर कारवाई करण्यासाठी महसूल प्रशासनाने पथकाचे गठण केले आहे. पथकाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी काही रेती तस्करांनी पथकावर हल्ला केला. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.-निलेश गौंड, तहसीलदार, चंद्रपूरयापूर्वी गुन्हे दाखल झालेल्या घटनारेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करीत असताना शासकीय कामात बळजबरी तसेच अडथळा निर्माण करणारे चंद्रपूर येथील संदीप रॉय याच्यावर ६ नोव्हेंबर २०१९ रोजी रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अटक करून वाहन जप्त केले.गौण खनिजाची चोरी व अवैध वाहतूक प्रकरणी जप्त केलेले वाहन शासकीय कार्यालय परिसरातून परस्पर पसार केल्याप्रकरणी पडोली येथील प्रल्हाद कामडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणीत आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.गौण खनिजाची वाहतूक करताना जप्त केलेले वाहन चंद्रपूर तहसील कार्यालयात जमा न करता परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी पडोली येथील अमीत गावंडे याच्यावर १९ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला.रेती तस्करी प्रकरणी पथकाने वाहनाचा पाठलाग करून वाहन थांबविले असता महसूल अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी प्रल्हाद कामडी यांच्यावर रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.पथकाद्वारे जप्त केलेल्या रेतीचा लिलाव करण्यात आला आहे. २०२०-२१ मध्ये रेतीचे पाच लिलाव करण्यात आले. या माध्यमातून प्रशासनाने २१ लाख २७ हजार ४०० रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.जप्त केलेल्या वाहनांची दंडाची रक्कम मोठी असते.त्यामुळे काहीवाहन मालक वाहन सोडविण्याच्या भानदगडीतसुद्धा पडत नसल्याचे समजते.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी