शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

सूर्याच्या प्रकोपाचा जनजीवनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2016 01:00 IST

चंद्रपूर जिल्हा मागील तीन दिवसांपासून अक्षरश: होरपळून निघतो आहे. सूर्याचा पारा ४५ अंशापार गेला आहे.

ओकतोयं आग : दाहकतेसोबतच पाणी प्रश्नही तीव्रचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मागील तीन दिवसांपासून अक्षरश: होरपळून निघतो आहे. सूर्याचा पारा ४५ अंशापार गेला आहे. शनिवारी ४३.६ तापमानाची नोंद झाली असली तरी मागील दोन दिवस जिल्ह्यातील तापमानाने उच्चांक गाठला होता. या वाढत्या तापमानाचा नागरिकांनी धसका घेतला असून जनजीवनच विस्कळीत झाले आहे. याशिवाय पाण्याचे स्रोत आटल्याने ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न तीव्रतेने उभा ठाकला आहे.‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरचा उन्हाळा राज्यात प्रसिध्द आहे. सर्वाहून अधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातच होत असते. यंदाही चंद्रपूर जिल्ह्याची ही ओळख कायमच राहणार, असे चित्र आतापासूनच दिसू लागले आहे. फेब्रुवारीपासूनच जिल्ह्यात उन्हाचे चटके बसू लागतात, असा अनुभव दरवर्षीच नागरिकांना येतो. मात्र यावेळी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याचे तापमान घटले होते. त्यामुळे उन्हाळ्याची चाहून यावर्षी उशिराने लागली. मात्र अवकाळी पावसाचा गारवा फार काळ टिकला नाही. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ऊन्ह तापू लागले. आता एप्रिल महिना लागताच सुर्याने आपला प्रकोप दाखविणे सुरू केले आहे. एप्रिल महिन्याचा पंधरवाडा लोटल्यानंतर तर सुर्याने अक्षरश: आग ओकणे सुरू केले आहे. गुरुवारी चंद्रपुरात ४५.५ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली. शुक्रवारी ४५ अंश सेल्सीयस तापमान नोंद करण्यात आले. याच दिवशी ब्रह्मपुरीला सूर्याचा पारा तब्बल ४६ अंशापर्यंत गेला होता. या वाढत्या उष्णतामानामुळे जवजीवनावरच परिणाम झाला आहे. सकाळी ९ वाजतापासून उन्हाचे चटके असह्य होऊ लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एरवी गजबजलेले चंद्रपुरातील मुख्य रस्ते दुपारी ओस पडू लागले आहेत. सध्या काही शाळा-महाविद्यलयांनाही सुट्या लागल्या असल्याने दुपारी शहरात निरव शांतता पसरल्याचे दिसून येत आहे. नागरिक सायंकाळीच बाहेर निघणे पसंत करीत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत तिघांचा उष्माघाताने मृत्यूही झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाचा चांगलाच धसका घेतला आहे. (शहर प्रतिनिधी)उन्हाळ्यातील विशेष दुकानेउन्हापासून बचाव करण्यासाठी नानाविध क्लुप्त्या लढविल्या जात आहे. तोंडाला दुपट्टा बांधल्याशिवाय कुणीच बाहेर निघत नाही. त्यामुळे दुपट्यांच्या दुकानांना सुगीचे दिवस आले आहे. ठिकठिकाणी ऊसाचा रस, नारळ पाणी, ताड, लिंबू पाणी यांची दुकाने लागली आहेत. थंडा आईस गोला, कुल्फी यांचीही दुकाने रस्त्यावर दिसून येत असून या दुकानांमध्ये नागरिकांचीही झुंबड दिसून येत आहे.ग्रामीण भागात पाण्यासाठी जीवघेणा संघर्षयंदा पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे जलाशय, नदी, तलाव-बोड्यात पाणी साठले नाही. आता तर तप्त उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटत चालले आहे. ग्रामीण भागातील अनेक बोअरवेल्स बंद आहेत. विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोरपना, जिवती तालुक्यात तर पाण्याची भिषण टंचाई जाणवत आहे. एका गावातील एकाच विहिरीवर दोन गावातील गावकऱ्यांना तहान भागवावी लागत आहे. असे असले तरी प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाही.‘मे’ हीटचा धसकाएप्रिल महिन्यातच सूर्याने नागरिकांच्या नाकीनऊ करून टाकले आहे. तप्त सूर्यकिरणे असह्य होत आहेत. एप्रिल महिन्यातच हे हाल आहेत तर पुढे मे महिन्यात कसे होईल, याचा धसका चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आतापासून घेतला आहे. मे महिन्यात येणाऱ्या उष्णतेची लाटेचा सामना कसा करावा, या चिंतेत चंद्रपूरकरांची झोप उडाली आहे.