शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

खासगी ट्रॅव्हल्सला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:56 IST

विना परवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या १२ खासगी ट्रॅव्हल्स चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक शाखेने जप्त केल्या. या ट्रॅव्हल्स नागपूर व गडचिरोली मार्गावर धावत होत्या. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅव्हल्स नामांकित व वातानुकुलीत आहेत.

ठळक मुद्दे१२ विना परवाना ट्रॅव्हल्स जप्त : आरटीओ, वाहतूक पोलीस शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विना परवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या १२ खासगी ट्रॅव्हल्स चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक शाखेने जप्त केल्या. या ट्रॅव्हल्स नागपूर व गडचिरोली मार्गावर धावत होत्या. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅव्हल्स नामांकित व वातानुकुलीत आहेत.चंद्रपूर येथून पुणे, नागपूर, गडचिरोली या ठिकाणी दिवसातून अनेक ट्रॅव्हल्स धावतात. मात्र बहुतेक ट्रॅव्हल्स धारकांकडे परवाना नाही. तसेच या वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त भाडे आकारून अवैध प्रवासी वाहतूक केली जात असल्याची माहिती आरटीओ व वाहतूक पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर आरटीओ विभाग व वाहतूक पोलिसांचे संयुक्त दोन पथक तयार करुन नागपूर व गडचिरोली मार्गावर खासगी वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी अनेक वाहने विनापरवाना धावत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे १२ ट्रॅव्हल्स जप्त करण्यात आले.यामध्ये एमएच ३४ एव्ही २०७७, एमएच ४० बीजी १५१८, एमएच २९ एव्ही ८२२२, एमएच ३३-१०२५, एम एच २७ ई ९३२८, एमएच ३४ एबी ८०४१, एमएच ३२ क्यू ४३७०, एमएच ३४ एव्ही १५७७, एमएच २९ एम ८१६० अशा क्रमांकाच्या ट्रॅव्हल्स असून डीएनआर, पर्पल, महालक्ष्मी या वातानुकूलित ट्रॅव्हल्सचा समावेश आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही. एन. शिंदे यांच्या नेतृत्वात वाहतूक निरीक्षक संपत चव्हाण, मोटार वाहन निरीक्षक आडे, गुलाने, तासके, काळे आदींनी केली.ट्रॅव्हल्स चालकांनी जास्त तिकीट आकारल्यास प्रवाश्यांनी तक्रार करावी, कारवाई केली जाईल, असे आवाहन चंद्रपूर आरटीओ कार्यालयाने केले आहे. 

टॅग्स :Travelप्रवास