शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेची जबाबदारी आता शाळा प्रशासनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST

चंद्रपूर : माध्यमिक शाळांमधील शिपाई पद बरखास्त करण्याचा निर्णय विचाराधीन असून, विद्यार्थी संख्येनुसार प्रतिशाळा शिपाई भत्ता लागू केला जाणार ...

चंद्रपूर : माध्यमिक शाळांमधील शिपाई पद बरखास्त करण्याचा निर्णय विचाराधीन असून, विद्यार्थी संख्येनुसार प्रतिशाळा शिपाई भत्ता लागू केला जाणार आहे. त्यामुळे आता स्वच्छतेची जबाबदारी शाळा प्रशासनावर राहणार आहे. सद्यस्थितीत शिपाई पदावरील कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ही पदे संपुष्टात येणार आहेत.

राज्यातील सर्व खासगी, अंशत: अनुदानित, अनुदानित, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना यापुढे सुधारित आकृतीबंध लागू करण्याऐवजी विद्यार्थी संख्येनुसार प्रतिशाळा शिपाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्यामुळे सध्या कार्यरत असलेले शिपाई सेवानिवृत्त झाल्यानंतर नव्याने पदे भरण्यास मंजुरी दिली जाणार नाही. तरीही पदे भरल्यास त्याचे वेतन अनुदान शाळेला दिले जाणार नाही. परंतु, शाळेची स्वच्छता व अन्य शिक्षणेतर कामे पाहता, शिपाई पद गरजेचे आहे. ही कामे शाळांना करुन घेता यावीत, या उद्देशाने शासनाकडून ठराविक भत्ता दिला जाणार आहे.

------

बॉक्स

विविध संघटनेचा विरोध

प्रतिशाळा महिना शिपाई भत्ता लागू राहणार असल्याचे सांगून शासनाने देण्यात येणारा भत्ता हा प्रतिशिपाई लागू असेल की नाही, याबाबत स्पष्ट केलेले नाही. प्रशासकीय कामांसाठी बाहेर फिरणे, शाळेची साफसफाई करणे, प्रयोगशाळेतील गोष्टींकडे लक्ष देणे आदी कामे शिपाई करतात. परंतु, शिपाई पदच बरखास्त केल्यानंतर अध्ययन-अध्यापन सहाय्यात आधार असलेले चतुर्थश्रेणी कर्मचारी मानधनावर काम करायला लागले तर चांगले कर्मचारी मिळणार नाहीत. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाला विविध संघटनांनी विरोध केला होता.

कोट

शिपाई पद व्यपगत करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. शाळा प्रशासनाला शिपाई पदासाठी पटसंख्येच्या आधारावर मानधन देण्यात येणार आहे.

- उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), चंद्रपूर

-----

कोट

शासनाने घेतलेला हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. मानधन तत्वावर शिपाई मिळणे कठीण आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा. यासंदर्भात आंदोलनही करण्यात आले होते.

नरेंद्र बोबडे, संस्था सचिव, संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ.

------

शासन आता खासगीकरणाकडे वळले आहे. शिक्षणक्षेत्रही यातून सुटलेले नाही. हा निर्णय बेरोजगारांवर अन्याय करणारा आहे. शासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा.

ॲड. पुरुषोत्तम सातपुते, सचिव, फिमेल एज्युकेशन सोसायटी, चंद्रपूर