शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाशी संबंधित समस्यांचे प्राधान्याने निराकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:22 IST

सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या वनविभागाशी संबंधित असलेल्या मागण्यांचे प्राधान्याने निराकरण करावे व नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना कोणताही त्रास होवू नये याची दक्षता वनाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश देऊन नागरिकांची तसेच शेतकऱ्यांची जाणीवपुर्वक अडवणूक करणाऱ्या वनाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

ठळक मुद्देवनमंत्र्यांचे निर्देश : अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या वनविभागाशी संबंधित असलेल्या मागण्यांचे प्राधान्याने निराकरण करावे व नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना कोणताही त्रास होवू नये याची दक्षता वनाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश देऊन नागरिकांची तसेच शेतकऱ्यांची जाणीवपुर्वक अडवणूक करणाऱ्या वनाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील वनविभागाशी संबंधित समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासंदर्भात आयोजित तक्रार निवारण सभेत ते बोलत होते.प्रामुख्याने वनउपज गोळा करणे, हिरवा बांबु चिचपल्ली वासीयांना मिळावा या मागण्यांच्या अनुषंगाने त्यांनी वनाधिकाऱ्यांना सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश दिले. सदर परिसर १०० टक्के आरोयुक्त, एलपीजी गॅस युक्त तसेच अंगणवाड्या आयएसओ युक्त करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु असुन लवकरच या कार्यवाहीला मुर्त रुप प्राप्त होईल, असेही यावेळी सांगितले. वनालगतच्या सर्व गावांच्या विकासाच्या दृष्टीने एक ब्ल्यु प्रिंट तयार करण्यात यावी असे निर्देश देत यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.येत्या १५ दिवसात चिचपल्ली येथे नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने रुग्ण्वाहीका उपलब्ध करण्यात येईल, मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने गावाला सोलर फेंन्सीग करण्यासाठी शासनातर्फे ९० टक्के अनुदान उपलब्ध केले जाते, यात १० टक्के निधी ग्रामपंचायतीने देणे बंधनकारक आहे. या दृष्टीने योग्य नियोजन केल्यास ही मागणी सुध्दा लवकरच पुर्णत्वास येवू शकते असे त्यांनी यावेळी सांगितले.गरम पाण्यासाठी लाकडे तोडण्यास जंगलात नागरिकांनी जावू नये या दृष्टीने गावात सोलर वॉटर हिटर ची व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. त्याच प्रमाणे या परिसरात रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करुन आराखडा तयार करावा असे निर्देशही त्यांनी दिले.

टॅग्स :forest departmentवनविभाग