शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा, अन्यथा रस्त्यावर उतरू

By admin | Updated: July 8, 2015 01:20 IST

शेतपिकाला भाव नाही, उत्पादन खर्च वाढले त्यामुळे शेतकरी नैराश्याचे जीवन जगत असून त्यांना आधार देण्याची गरज आहे.

सुदर्शन निमकर यांचा इशारा : राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या सादरराजुरा : शेतपिकाला भाव नाही, उत्पादन खर्च वाढले त्यामुळे शेतकरी नैराश्याचे जीवन जगत असून त्यांना आधार देण्याची गरज आहे. मात्र शासन केवळ पोकळ आश्वासन देऊन त्यांची बोळवण करीत असून शासनाने शेतकरी, शेतमजूर व युवक बेरोजगारांच्या समस्या लवकर मार्गी काढाव्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दिला. राजुरा येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुक्यातील ज्वलंत समस्या संदर्भात व आगामी ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगर पालिका गटनेते शरीफभाई सिद्धीकी, नंदकिशोर वाढई, तालुका अध्यक्ष हरिदास झाडे, युवक तालुका अध्यक्ष रामभाऊ देवईकर, महिला अध्यक्ष लता ठाकरे, नगरसेविका पुष्पा कोडापे, माया रोगे, आदित्य भाके, शहर युवक अध्यक्ष नितीन बांभ्रटकर, रेणुका सावरकर, भावना ताठे, शुभांगी पिंपळकर, शारदा मोहितकर, उषा करमनकर यांची मंचावर उपस्थिती होती.सभेमध्ये राजुरा तालुक्यातील प्रमुख समस्यांपैकी भूमी अधिग्रहण कायदा लागू करण्यात येऊ नये, निम्न पैनगंगा प्रकल्पाचा लाभ क्षेत्रातील जमिनीची खरेदी विक्रीवरील बंदी उठविण्यात यावी, खरीपामध्ये तालुक्यातील ५४ गावे समाविष्ठ करण्यात यावे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी, विहिरगाव येथे वीज वितरणच्या सबस्टेशनचे काम सुरू करण्यात यावे, पेसा कायद्यामध्ये सुधारणा करुन मच्छीमार संस्थाना तलाव तडजोडीने देण्यात यावे, बेरडी गावाचे पूर्नवसन करुन भेंडाळा सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात यावे, सेतु केंद्रातून सात-बारा उतारा देण्यात यावा, ई- फेरफर कार्यालयात सुद्धा करण्यात यावी इत्यादी समस्याबाबत चर्चा करण्यात आली. कार्यकर्ता सभेनंतर पाचशे शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार युवक कार्यकर्त्यासह गांधी चौक, जुना बसस्टॅन्ड मार्गे समस्या सोडविण्याकरीता शासन विरोधी घोषणा देत उपविभागीय अधिकारी कार्यालयात धडकले. उपविभागीय अधिकाऱ्यांना समस्यांचे निवेदन देऊन समस्या न सोडविल्यास शेतकरी, शेतमजूर, युवक यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, असा इशारा दिला. (शहर प्रतिनिधी)