शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भारत मातेच्या गौरवासाठी संकल्प करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:31 IST

काश्मिरमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संपूर्ण देश अशा वेळी सैन्यदलांच्या पाठीशी आहे. मात्र आमची देशभक्ती, देशाप्रतीची भावना आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो. त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करण्यातून सिद्ध करण्याची वेळ आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या आयुष्यात बदल आणण्यासाठी प्रयत्न करूया. भारत मातेच्या गौरवासाठी संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : शहिदांना श्रद्धांजली अर्पण करीत विकास कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काश्मिरमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संपूर्ण देश अशा वेळी सैन्यदलांच्या पाठीशी आहे. मात्र आमची देशभक्ती, देशाप्रतीची भावना आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो. त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करण्यातून सिद्ध करण्याची वेळ आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या आयुष्यात बदल आणण्यासाठी प्रयत्न करूया. भारत मातेच्या गौरवासाठी संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर महानगरातील भानापेठ प्रभागातील पीएच नगर परिसरातील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे व नालीचे बांधकामाच्या भूमिपूजन व भानापेठ मधील माता मंदिर परिसरातील अन्य एका रस्त्याचे भूमीपूजन केल्यानंतर ते नागरिकांशी संवाद साधत होते. व्यासपीठावर आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनील फुलझेले, नगरसेवक संजय कंचर्लावार, आशा आबुजवार, राजीव अडपेवार, माजी महापौर राखी कंचर्लावार, शितल कुळमेथे आदी उपस्थित होते.भानापेठ परिसरातील पीएच नगरात ११० मीटर लांबीच्या या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे. तसेच या ठिकाणी २०० चौरस मीटर परिसरात एका बगीच्याचे देखील सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. ५० लाख रुपयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच भानापेठ क्रमांक ११ मधीलच माता मंदिर परिसरातील भूमीगत नाली व रस्त्याचे ३० लाख रुपयांचे बांधकाम भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी नागरिकांनी उर्वरित कामांसाठी निवेदने दिलीत.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद जवानांना श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली. त्यानंतर बोलताना ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यासाठी सुरू केलेल्या वेगवेगळ्या मिशनची माहिती दिली. आपल्या वार्डातील व परिसरात गरिबी रेषेच्या खाली येणाऱ्या नागरिकांसाठी दोन व तीन रुपये दराने अन्नधान्य उपलब्ध करणारे मिशन दिनदयाल सुरू करण्यात आले आहे. जे गरीब असतील त्या सर्वांना यामध्ये समाविष्ट करण्यात येत आहे. अशा सर्व नागरिकांची माहिती गोळा करणे नगरसेवकाला माहिती देणे या कामातही पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मिशन सेवा, मिशन शक्ती सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच मिशन मंथनच्या माध्यमातून १०० आदिवासी युवकांना उद्योजक बनवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अमृत योजनेची कामे पूर्ण केल्यानंतर रस्ते करावेत, अशी सूचना महापौर घोटेकर यांना दिल्या. संचालन उमा कुकुडवाड यांनी केले.