शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रम्हपुरी जिल्हा निर्मितीसाठी पंचायत समितीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:26 IST

जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्मिती करण्यासंदर्भात राज्य शासन विचार करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरी पंचायत समितीने ठराव पारित केल्याने तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

ठळक मुद्देबहुमताने मंजूर : पं. स. च्या सर्व सदस्यांचा पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्मिती करण्यासंदर्भात राज्य शासन विचार करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरी पंचायत समितीने ठराव पारित केल्याने तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.उपसभापती विलास उरकुडे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून ब्रम्हपुरी जिल्हा शासनाने घोषित करावा, असा ठराव सभागृहात मांडला या ठरावाला गटनेते रामलाल दोनाडकर यांनी अनुमोदन दिले. विशेष म्हणजे, सत्ताधारी गटाच्या नऊ सदस्यांनी पाठिंबा देऊन हा ठराव सभागृहात बहुमताने संमत केला. यासंदर्भात माहिती देताना उपसभापती उरकुडे म्हणाले, ब्रम्हपुरी हे शहर मध्यवर्ती ठिकाण आहे. लोकसंख्या, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय सोयी सुविधा, विविध विभागांची शासकीय कार्यालये उपलब्ध आहेत. जिल्ह्याचे विभाजन करताना शासनाने प्रामुख्याने ब्रम्हपुरी शहराचाच आधी विचार करावा, यासाठी हा ठराव घेण्यात आला. गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या आधीपासूनच ब्रम्हपुरी जिल्ह्याची मागणी सुरू झाली होती. परंतु याकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे , असेही त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.शासनाने जिल्ह्याचे विभाजन करताना सर्वप्रथम ब्रम्हपुरीचा विचार करावा. ब्रम्हपुरी हे ठिकाण चंद्रपूरपासून १२५ किमी लांब आहे. तालुक्यातील जनतेला शासकीय कामासंदर्भात ये-जा करताना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. ब्रम्हपुरी शहर आणि परिसराचा अद्याप विकास झाला नाही.नवीन जिल्हा निर्मिती झाल्यास विकासाला चालना मिळेल. जिल्हास्थळाच्या दृष्टीने पायाभूत सुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे पंचायत समितीने यासंदर्भात बहुमताने ठराव पारित करण्यात आला. शासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या ब्रम्हपुरीला जिल्ह्याचा दर्जा प्रदान करावा, यावर उपस्थित सदस्यांनी पं. स. सभागृहात समर्थनार्थ ठाम भूमिका मांडल्याने मागणीला चळवळीचे स्वरूप येऊ शकते.शासनाला ठराव पाठविणारराज्य सरकारने जिल्हा निर्मितीसंदर्भात हालचाली सुरू केल्याचे वृत्त माध्यमातून पसरले आहे. परंतु, मागील अनेक वर्षांपासून ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी जनजागृती मोहीम राबविले जात आहे. या मागणीला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा असून विविध सामाजिक संघटनादेखील प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. या परिसराच्या विकास अनुशेष अद्याप पूर्ण झाला नाही. अनेक कामे रेंगाळली आहेत. जिल्हा झाल्यास विकासाला गती येईल. तसेच नागरिकांच्या समस्या दूर होतील. पंचायत समितीच्या वतीने हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.