शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाला धक्का लावता कामा नये

By admin | Updated: August 24, 2014 23:24 IST

आदिवासींच्या आरक्षणाला हात लावता कामा नये, असा इशारा गोंडवाना टायगर्स या संघटनेने राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.

चंद्रपूर : आदिवासींच्या आरक्षणाला हात लावता कामा नये, असा इशारा गोंडवाना टायगर्स या संघटनेने राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.सत्ताधारी महाराष्ट्र शासन व सत्तेतील काही मोठी मंडळी आदिवासींच्या जिवावर उठले आहेत. धनगर व अन्य ५० जातींचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी हस्तक्षेप सुरु आहे. आपल्या राजकीय महत्वकांक्षेच्या पूर्तीकरिता गुण्या गोविंदाने खेड्यापाड्यात, गावागावांत पिढ्यान्पिढ्या राहत असलेल्या जाती-जातीमध्ये, संघर्षाची पार्श्वभूमी तयार केल्या जात आहे. शासनाच्या या षडयंत्राचा गोंडवाना टायगर्सच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. राज्यपालांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून गोंडवाना टायगर्सने या विषयावर आपली भूमिका जाहीर केलेली आहे.संविधानाच्या तरतुदी नुसार अनुसूचित जमाती व जनजाती प्रवर्गास ७.५० टक्के संविधानात्मक आरक्षण बहाल करण्यात आले. परंतु १९५१ ते १९७६ पर्यंत क्षेत्र बंधनामुळे संपूर्ण समाजाला आरक्षण प्राप्त झाले नाही. सामाजिक आंदोलनामुळे १९७६ साली क्षेत्रबंधन हटविण्यात येऊन, राज्यस्तरावर अनुसूचित जमातीची यादी तयार करण्यात आली व १९७६ नंतर संपूर्ण आदिवासी जमातीला आरक्षणाचे संविधानात्मक अधिकार प्रदान करण्यात आले. या अनुषंगाने विचार केल्या आरक्षणाच्या सोई-सवलतींपासून हा समाज २५ वर्षे दूर राहीला आहे. आदिवासींच्या घटनात्मक आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये कोणताही बदल न करता शासनाने निर्णय घ्यावा. अनुसूचित जमातीच्या यादीतून बोगस आदिवासी जातींना वगळण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात गोंडवाना टायगर्सचे संयोजक प्रविण आडेकर, अध्यक्ष श्रीकांत नैताम, गोंडवाना विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धीर शेडमाके, मनोज आत्राम, दिलीप किन्नाके, नीळकंठ परचाके, घनश्याम सुरपाम, राजा आडेकर, पांडुरंग जुमनाके यांच्यासह गोंडवाना टायर्गस या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)