शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

नगरपालिकांचे आरक्षण जाहीर

By admin | Updated: July 3, 2016 01:10 IST

नगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होऊ घातली आहे.

प्रभागनिहाय आरक्षण : बल्लारपूर, वरोरा, मूल, राजुरा नगरपालिकाचंद्रपूर : नगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, मूल, राजुरा नगरपालिकांच्या सभागृहात सबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज शनिवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. मागील वर्षीप्रमाणे महिलांसाठी ५० टक्के आरक्षण या सोडतीतही ठेवण्यात आले आहे.बल्लारपुरातील एकूण १६ प्रभागातील ३२ उमेदवारांच्या निवडीसाठी शनिवारी येथील नगरपालिकेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी कल्पना निळ यांच्या अध्यक्षतेखाली जातीनिहाय संवर्गातील पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती महिला ५, अनुसूचित जमाती एक, नागरिकांचा मागास प्रवर्ग ५ व सर्वसाधारण प्रवर्गातील ५ अशा एकूण १६ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या.बल्लारपूर नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी १६ प्रभाग निश्चित करण्यात आले. एका प्रभागातून दोन उमेदवारांना निवडून द्यावे लागणार आहे. यासाठी अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमाती दोन, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ९ आणि सर्वसाधारणसाठी १२ असे एकूण ३२ नगरसेवकांच्या निवडीसाठी आरक्षण सोडत प्रिती शिवराम गेडाम व सुजल दिलीप कोरडे या बालकांच्या हस्ते काढण्यात आले. आरक्षण सोडतीत प्रभाग एक- अ- ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग दोन- अ- अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग तीन-अ- अनुसूचित जाती महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग चार-अ- ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग पाच-अ- ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग सहा-अ- ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग सात-अ- अनुसूचित जाती महिला, ब- ओबीसी, प्रभाग आठ-अ- अनुसूचित जाती महिला, ब- ओबीसी, प्रभाग नऊ-अ- ओबीसी, ब- सर्वसाधारण महिला असे आरक्षण राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रभाग १० अ मध्ये अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग ११ मध्ये अ- अनुसूचित जमाती महिला, ब-ओबीसी, प्रभाग १२ मध्ये अ- अनुसूचित जमाती, ब- ओबीसी महिला, प्रभाग १३ मध्ये अ- अनुसूचित जाती महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग १४ मध्ये अ- अनुसूचित जाती महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग १६ मध्ये अब- अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण महिला यानुसार आरक्षणाची सोडत काढण्यात आली.वरोरा नगरपालिकेच्या १२ प्रभागांसाठी आरक्षण काढण्यात आले. यात प्रभाग १ मध्ये अ-अनुसूचित जमाती महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग २ मध्ये अ-ओबीसी महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग ३ मध्ये अनुसूचित जाती महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग ४ मध्ये अनुसूचित जमाती महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग ५ मध्ये अ-ओबीसी, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग ६ मध्ये अ-ओबीसी महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग ७ मध्ये अ-अनुसूचित जाती महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग ८ मध्ये अ-ओबीसी, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग ९ मध्ये अनुसूचित जमाती, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग १० मध्ये अ-अनुसूचित जाती, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग ११ मध्ये अ-ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग १२ मध्ये अ-ओबीसी, ब-सर्वसाधारण महिला, असे आरक्षण काढण्यात आले. आरक्षण जाहीर झाल्याने आता पालिका क्षेत्रात राजकीय मोर्चेबांधणीलाही वेग आला आहे. (संबंधित वृत्त/४)