शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाचे आयुष्य बदलविणारा संशोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:25 IST

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथांवर मात करण्यासाठी दादाजी खोब्रागडे यांनी विद्यापीठीय संशोधकांना लाजवेल, अशा पद्धतीचे मूलगामी संशोधन कृषी क्षेत्रात केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी दिवसरात्र संशोधनात मग्न राहून भातशेतीचे कृषिविज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर नेणाऱ्या शेतीनिष्ठ संशोधकाच्या निधनाने कृषी संशोधन व विस्तार कार्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.नागभीड तालुक्यातील नांदेड ...

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथांवर मात करण्यासाठी दादाजी खोब्रागडे यांनी विद्यापीठीय संशोधकांना लाजवेल, अशा पद्धतीचे मूलगामी संशोधन कृषी क्षेत्रात केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी दिवसरात्र संशोधनात मग्न राहून भातशेतीचे कृषिविज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर नेणाऱ्या शेतीनिष्ठ संशोधकाच्या निधनाने कृषी संशोधन व विस्तार कार्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.नागभीड तालुक्यातील नांदेड येथे अल्पभूधारक शेतकरी म्हणून सुरुवातीला पारंपारिक शेती करीत होते. दादाजींनी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या आजारपणाच्या खर्चासाठी तीन एकर भाताची शेती विकली होती. सुनेच्या वडिलांनी दिलेल्या दीड एकर शेतीवर घरातल्या सहा जणांचा चरितार्थ चालत होता. घर चालविण्याबरोबरच नातवंडांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी दादाजी आपली शेती सांभाळून दुसºयांच्या शेतीवर मजुरी करू लागले. १९८३ ला दादाजींनी शेतात पहिल्यांदा ‘पटेल’ या जातीच्या धानाची लागवड केली. पिकांचे सूक्ष्म निरीक्षण करताना त्यांना धानाच्या तीन रोपांच्या पांढऱ्या लोंबीवर पिवळे ठिपके दिसले. तीन रोपांचे बी वेगळे काढून पुढील हंगामात त्याच बियांची पेरणी केली. हे धानाचे पीक आवडल्याने दादाजींनी त्याचेच पुढे बीजगुणन सुरू ठेवले. परिसरातील शेतकऱ्यांना आवडल्याने मागणी वाढली. हेच वाण पुढे लोकप्रिय ‘एचएमटी सोना’ या नावाने शेतकऱ्यांची मने जिंकली. मातीत राबवूनही शेतकºयांच्या हातात फारसे उत्पन्न येत नसल्याचे पाहून भात शेतीच्या समस्यांच्या मूळाशी गेले आणि उपाययोजना शोधली. परिसरातील शेतकºयांशी संवाद साधून शेतीचे निरीक्षण करण्याची त्यांच्याकडे विलक्षण हातोटी होती. त्यामुळे पर्यावरणाच्या सर्व बदलांचा आमूलाग्र अभ्यास करून भाताचे नवीन वाण विकसित केले. हा प्रयोग स्वत:च्या शेतीतूनच सुरुवात केला होता. भाताचे एचएमटी वाण हे दादाजी खोब्रागडे यांच्या प्रचंड परिश्रमाचे प्रतीक आहे. या संशोधनामुळे दादाजी खोब्रागडे यांना राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाले. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनीही गौरव केला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘फोर्ब्स’ ने दादाजींच्या संशोधनाची दखल घेतली. परंतु, आयुष्याच्या उत्तरार्धात दादाजींना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. दरम्यान माध्यमांनी दादाजींची व्यथा मांडल्यानंतर राज्य सरकारने दोन लाखांची मदत केली होती. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही आर्थिक मदत करून कृतज्ञता व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या जीवनातील दाहकता सोसून शेतीतच संशोधन करणाऱ्या दादाजींच्या निधनाने समग्र कष्टकरी समुदायांमध्येच शोककळा आहे.