शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संशोधन व तंत्रज्ञान शेतात पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:00 IST

विद्यापीठाचे नाविण्यपूर्ण संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रभाविपणे पोहोचविण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथील कृषी विज्ञान केंद्राला भेटीदरम्यान अधिकाऱ्यांना दिले. केद्र शासनाच्या धोरणानुसार कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे गुरूवारी त्यांनी भेट दिली होती. त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे निर्देश : सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्राला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : विद्यापीठाचे नाविण्यपूर्ण संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रभाविपणे पोहोचविण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथील कृषी विज्ञान केंद्राला भेटीदरम्यान अधिकाऱ्यांना दिले. केद्र शासनाच्या धोरणानुसार कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे गुरूवारी त्यांनी भेट दिली होती. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी ना. अहीर पुढे म्हणाले, जवस, कुलथा, लाख ही परिसरातील पारंपारिक पिके असून अधिक प्रथीनेयुक्त हे अन्न असल्याने त्यांच्या लागवडीचे स्त्रोत वाढविण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहित करावे.तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवक व शेतकºयांना प्रक्रिया उद्योग, कुक्कुटपालन, दुग्धउत्पादन व शेळीपालनसाठी प्रोत्सोहित करावे, असेही आवाहन उपस्थित अधिकाºयांना केले. सुबाभूळ व शेवगा हे शेळीसाठी उपयुक्त चारा असल्याने सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून त्याची लागवड पडीक जमिनीवर करावी व शेळीपालनातील खाद्यावर होणारा खर्च कमी करावा, असेही त्यांनी यावेळी सूचविले. कृषी विज्ञान केंद्राचा आर्थिक अहवाल पाहता पगार व इतर भत्ते यात ९१ टक्के तर विस्तार योजनांवर केवळ ९ टक्के हे गुणोत्तर पाहून ना. अहीरांनी आश्चर्य व्यक्त केले. विस्तार योजनांवर अधिक निधी मागून लक्षांकात वाढ करण्याचे निर्देश दिले.माती परिक्षण, प्रशिक्षण, भेटी व इतर विस्तार योजनांवर कमी काम दिसत असल्याने असमाधान व्यक्त करून या संदर्भात पंजाबराव कृषी विद्यापीठाला अहवाल कळविण्यात येईल, असे बैठकीत सांगितले.चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त कापूस एक लाख ८२ हजार ७०० हेक्टर भात एक लाख ५० हजार ५०० हेक्टरवर लागवडीखाली आहे.त्यामुळे कृषी तंत्राज्ञान व संशोधन हे शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याकरिता अधिक प्रयत्न करावे लागेल, असे अधिकाºयांना सूचविले. सदर बैठकीला गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर, जि. प. सदस्य संध्या गुरनुले, कमलाकर सिद्दमशेट्टीवार, प्रभाकर भोयर, किसान विज्ञान केंद्राचे प्रमुख नागदेवे व इतर अधिकारी तसेच प्रयोगशील शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.