शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

शिक्षक संघाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन

By admin | Updated: October 11, 2015 02:21 IST

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली.

गोंडपिंपरी : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. मात्र हे काम शिक्षकांकडून काढून घेण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन गोंडपिपरी तालुका शिक्षक संघाच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले. शिक्षण विभागाच्यावतीने अगोदरच विद्यार्थ्यांसाठी ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला. त्यातच चंद्रपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने ‘मिशन नवचेतना’ पायाभूत चाचण्या व मूल्यमापन, मुलांचे वैयक्तिक निरीक्षण व नोंदी, प्रथम सत्र परीक्षा, सरल डाटाबेसअंतर्गत विद्यार्थी, शिक्षक व शाळेची सर्व माहिती आॅनलाईन अद्ययावत करणे आदी महत्त्वपूर्ण काम प्रत्येक शिक्षकांकडे असल्याने सध्या शिक्षक व्यस्त आहेत. त्यातच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम प्राथमिक शिक्षकांकडे सोपविल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यातच याप्रकारची अशैक्षणिक कामे प्राथमिक शिक्षकांवर लादल्याने नेमकी कोणती कामे करायची, असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावे म्हणून अखिल गोंडपिंपरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने गोंडपिंपरीच्या तहसीलदारांना राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम शिक्षकांकडून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रेमदास खोब्रागडे, सचिव बावणे, अभय कासनगोट्टूवार, मुरलीधर सरकार, शेखर दहिवले, योगेश पावसे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)