शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांना निवेदन: युवा विद्यार्थी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2016 01:09 IST

मुंबई येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटींग प्रेसला ऐतिहासीक वारसा लाभला आहे.

आंबेडकर भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करा बल्लारपूर : मुंबई येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटींग प्रेसला ऐतिहासीक वारसा लाभला आहे. शासनाची जबाबदारी ऐतिहासीक स्थळाचे जतन करण्याची आहे. मात्र मनमानी कारभार करुन काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन त्यावर बुलडोजर चालवून पाडण्यात आले. यामुळे आंबेडकरी समाज दुखावला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बल्लारपूर येथील डॉ. आंबेडकर अवेकन युथ विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील तहसीलदार विकास अहीर यांना मंगळवारला दिलेल्या निवेदनातून केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर जयंती जगभर साजरी केली जात आहे. त्यांनी सामाजिक, राजकीय, धार्मिक, घटनात्मक मसुदा तयार करण्याचे कार्य दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनातून केले. समाजाची जागृती करण्यासाठी बुद्धभूषण प्रेसच्या माध्यमातून कार्य करण्यात आले. मुक समाजाला स्वाभिमानाचे धडे याच वास्तुमधून देण्यात आले. राज्य सरकार राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विश्वस्मारक उभारण्याची घोषणा करीत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या वास्तुची तोडफोड करीत आहे. या विरोधाभासामुळे आंबेडकरांना मानणाऱ्या समाजातील लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचे तीव्र पडसाद बल्लारपूर शहरात उमटले असून विद्यार्थ्यांची संघटना पुढे सरसावली आहे. ऐतिहासीक वारसा जमीनदोस्त करणाऱ्यांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवेकन युथ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी केली. याचे निवेदन येथील तहसीलदार विकास अहीर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. यावेळी निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात बल्लारपूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवेकन युथ विद्यार्थी संघटनेचे निखील सुखदेवे, प्रक्षय मोडक, जया भसारकर, प्रियंका चव्हाण, सोनाली गायकवाड, बादल देशभ्रतार, अर्जुन वैरागडे, कपील ढाले, अंकीत कवाडे, प्रतीक्षा करमनकर, शिंकू ताकसांडे, अंकीता डुंबेरे, दीक्षा मालखेडे, नेहा कोल्हे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)