चंद्रपूर : अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर कोरोनाचे सर्व नियम पळून नुकताच पार पडले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंबेडकरी विचारवंत सुनील खोब्रागडे, प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, ज्येष्ठ नेते अशोक निमगडे, समता सैनिक दलाचे अध्यक्ष अशोक टेभरे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पक्षाध्यक्ष प्रवीण खोब्रागडे म्हणाले, पक्षाची प्रतिमा जनमानसात उंचवण्यासाठी, गावात-वाॅर्डात प्रचार प्रसार करणे, सर्व जाती, धर्म व पंथांच्या लोकांचे प्रश्नांना वाचा फोडणे यासोबतच पक्ष बांधणी करणे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. आंबेडकरी विचारवंत सुनील खोब्रागडे यांनी शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सोबतीला घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन संकल्पनेची प्रामाणिकपणे भारतीय जनतेच्या मनात रुजवणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक राजू खोब्रागडे तर आभार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रेमदास बोरकर यांनी मानले. यावेळी अशोक खंडारे, हंसराज उंदिरवडे, हेमंत सहारे, प्रतिमा बन्सोड, नीता सहारे, अशोक खोब्रागडे, ज्योती उंदिरवाडे, वनमला झाडे, ज्योती चौधरी, धर्मेंद्र वंजारी, सुरेश शंभरकर, मृणाल कांबळे, लीना खोब्रागडे, ज्योती शिवणकर, निर्मला नगराळे, प्रेरणा करमरकर, अश्विनी खोब्रागडे, सुनीता गायकवाड, हेमलता वाळके, नागसेन वानखेडे, राजकुमार जवादे, प्रा. टी. डी. कोसे, शंकर वाल्हेकर, प्रजीक डोर्लीकर, राजस खोब्रागडे, शुभम शेंडे, मुन्ना आवळे, सुधीर ढोरे आदी उपस्थित होते.