शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिन ठरला विद्यार्थिनींचा स्वातंत्र्य दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 01:04 IST

पोंभुर्णा तालुक्यातील थेरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन विद्यार्थिंनींचा स्वातंत्र्य दिन ठरला आहे.

थेरगाव जिल्हा परिषद शाळा : अधिकाधिक संधी देऊन नेतृत्वाला वावचंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील थेरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन विद्यार्थिंनींचा स्वातंत्र्य दिन ठरला आहे. शिक्षक किंवा मान्यवर पाहुण्यांऐवजी या शाळेने आपल्या विद्यार्थिनींना गावातील गणराज्य दिनाच्या तीन कार्यक्रमाचे संचालन करण्याची संधी दिली. आजवर या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक करायचे. मात्र पहिल्यांदा ही मोठी जबाबदारी विद्यार्थिनींनीनी समर्थपणे सांभाळली.शाळा, ग्रामपंचायत व मच्छीमार सेवा सहकारी सोसायटी या तिन्ही ठिकाणच्या ध्वजारोहण कार्यक्रमाचे संचालन इयत्ता सातवीतील स्वाती वाघमारे हिने केले. मुख्याध्यापकांना ध्वजारोहनासाठी पाचारण करण्याचे कार्य इयत्ता सातवीची माधुरी मंडरे पार पाडले. तिने टोपी घालून कदमताल करत पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर शाळेतील मार्गदर्शन व बक्षीस वितरण कार्यक्रमाचेही संचालन स्वातीनेच केलेसदर कार्यक्रमाच्या वेळी तब्बल ४४ विद्यार्थ्यांनी भाषणासाठी नोंद केली होती. त्यातही मुलींचे प्रमाण अधिकच होते. कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षकांनी भाषण लिहून दिले होते, हे विशेष. तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे आपले विचार प्रकट केले. व सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांनी आजवर मिळवलेल्या यशासाठी बक्षीस वितरण परंपरेप्रमाणे गावकाऱ्यांकडून करण्यात आले. इयत्ता सातवीमधील काजल सिडांम हिला आजवर कुपोषित, अप्रगत व स्वमग्न असलेली मुलगी समजले जात होते. पण तिने स्वत: भाषण तयार करून धैर्याने सादर केले. हे तिच्या जीवनातील पहिले भाषण होते. शिक्षकांनी तिला खुप बक्षिसे दिली. (प्रतिनिधी)