शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:22 IST

सुरूवातीला पहाडावर दमदार पाऊस झाल्याने पीक परिस्थिती समाधानकारक होती. मात्र तब्बल महिनाभरापासून निसर्गाच्या पावसाने पाठ फिरवल्याने डोलदार दिसनारी पिके करपत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पुन्हा चुराडाच होत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देपहाडावरील शेतकरी संकटात : हजारो हेक्टरवरील कापूस पिके धोक्यात

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : सुरूवातीला पहाडावर दमदार पाऊस झाल्याने पीक परिस्थिती समाधानकारक होती. मात्र तब्बल महिनाभरापासून निसर्गाच्या पावसाने पाठ फिरवल्याने डोलदार दिसनारी पिके करपत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पुन्हा चुराडाच होत असल्याचे दिसत आहे.परिसरातील सेवादासनगर, दमपुरमोहदा, रोडगुडा, देवलागुडा, मुकादमगुडा, परमडोली, महाराजगुडा, लोलडोह, पाटागुडा आदी गावातील शेतकºयांच्या शेतात अशीच परिस्थिती आहे. याच नव्हे तर पहाडावरील प्रत्येक गावात पिके करपली जात असल्याचे चित्र असून कोरडवाहू शेतकºयांवर संकटच कोसळले आहे.अतिदुर्गम समजल्या जाणाºया तालुक्यातील शेतकºयांचा मुख्य व्यवसाय शेती असून कोरडवाहू शेतीत कापूस ,ज्वारी, तूर ,सोयाबीन ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. सुरूवातीच्या समाधानकारक पावसामुळे शेतकºयांच्या शेतातील पिके डौलदार दिसत होती. यावर्षी तरी चांगले पीक येईल व उत्पादनात वाढ होईल, अशी आशा शेतकºयांना होती. मात्र अल्पावधीतच त्यांच्या आशा पावसामुळे मावळल्या आहेत. पेरणीनंतरच्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. त्यात नाल्यालगत असलेल्या अनेक शेतकºयांच्या शेतातील पिके वाहून गेली तर अनेकांच्या शेतातील पिके पिवळी पडले होती. अशी स्थिती असतानाही पहाडावरील शेतकऱ्यांनी हार मानली नाही. आहे ती पिके जगविण्यासाठी महागडी कीटकनाशके खरेदी करून फवारणी केली जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणात खतही टाकले आहेत. गेल्या महिनाभरापासून परतीच्या पावसाने उघाड दिल्याने आणि कडाक्याच्या उन्हामुळे आहे ते पिकेही करपून गेली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.पिके जगविण्यासाठी धडपडज्या शेतकऱ्यांकडे शेतात पाण्याची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी करपत असलेली पिके जगविण्यासाठी आॅईल इंजिन, विद्युत मोटापंपाच्या साहाय्याने पाणी देत पिके जगविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. कोरडवाहू शेतकरी मात्र आज ना उद्या पाऊस येईल, या आशेने आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.मागील काही दिवसांपासून निसर्गाच्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिके करपली आहेत. अजून काही दिवस उघाड राहिल्यास पहाडावरील शेतकºयांना जगणे कठीण होईल.- महेश देवकते, उपसभापती पं.स.,जिवती