शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वनकामगारांवरील अन्याय तत्काळ दूर करावा

By admin | Updated: January 15, 2017 00:49 IST

वनविभागात काम करणाऱ्या रोजंदारी वनकामगारांनी कायम करण्याची मागणी करू नये म्हणून विभागाने त्यांना ९० दिवस पूर्ण होताच कामावरून कमी करण्याचा सपाटा सुरू केला आहे.

कामावरून केले कमी : कामगारविरोधी परिपत्रकाचा फटकाचंद्रपूर : वनविभागात काम करणाऱ्या रोजंदारी वनकामगारांनी कायम करण्याची मागणी करू नये म्हणून विभागाने त्यांना ९० दिवस पूर्ण होताच कामावरून कमी करण्याचा सपाटा सुरू केला आहे. हा वनकामगारांवर अन्याय असल्याचा आरोप विदर्भ वनकामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.वनविभागात रोजंदारी काम करणाऱ्या वनकामगारांची संख्या मोठी आहे. हे सर्व कामगार मजुरीने काम करतात. ९० दिवसांचे काम पूर्ण झाले की त्यांना कामावरून कमी करण्यात येते. त्यांना २४० दिवस काम करू दिले जात नाही. २४० दिवस पूर्ण झाले तर तो न्यायालयात दाद मागू शकतो. त्यामुळे त्याला कमी दिवस झाले की कामावरून कमी केले जाते.काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात २०१२ मध्ये हे परिपत्रक काढण्यात आले होते. भाजपच्या राजवटीत हे परिपत्रक रद्द होईल, अशी आशा होती. मात्र, भाजपच्या कार्यकाळातही या कामगारविरोधी परिपत्रकाची अंमलबजावणी केली जात आहे. याबाबत वनमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. त्यांना वर्षभराचे काम उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली ंआहे. (शहर प्रतिनिधी)कायम कामगारांएवढीच मजुरी द्यामागील पंचवार्षिकमध्ये सत्तांतर होऊन भाजपाची सत्ता आली. भाजप सरकार तरी वनकामगारांचा विचार करेल, असे वाटले होते. मात्र तसे झाले नाही. वनविभागाने वनकामगारांशी चालविलेला हा खेळ बंद करावा. त्यांना कायम कामगाराएवढीच मजुरी देण्यात यावी, अशी मागणी विदर्भ वनकामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केली आहे.