शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बदली प्रक्रियेतील त्रुटी तातडीने दूर करा

By admin | Updated: April 25, 2017 00:26 IST

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर सोमवारी रखरखत्या उन्हात धरणे देण्यात आले.

वेतन श्रेणी द्या : पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे धरणेचंद्रपूर : महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर सोमवारी रखरखत्या उन्हात धरणे देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये बदली प्रक्रियेतील त्रुटी तातडीने दूर करून इतर जिल्ह्यांप्रमाणे अवघड क्षेत्र निवड तत्काळ करण्याची मागणी करण्यात आली. तसेच गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित ७५२ शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.राज्यात सर्वत्र समायोजन, विषयशिक्षक पदस्थापना व बदल्या बाबत हालचाली सुरू असताना चंद्रपूर शिक्षण विभाग मात्र शांत आहे, असा आरोप यावेळी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीचे अध्यक्ष विजय भोगेकर यांनी केला.शिक्षक समितीने जिवती सारखा तालुक्यातील सर्व गावे अवघड क्षेत्रामध्ये घेण्याची मागणी केली. तालुक्यातील दुर्गम,अवघड असलेली गावे यादीतून वगळण्यात आली आहेत. तालुका क्षेत्र निवड समितीने शासन निर्णयातील तरतुदीनुसार गावांच्या परिस्थितीचा योग्य अभ्यास न करता अहवाल पाठवला आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झाला आहे. विषय शिक्षकांची पदस्थापना, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना भारमुक्त करणे, विज्ञान पदविधरांना विषय शिक्षक पदस्थापनेत प्राधान्य देणे आदी विविध मागण्या समितीने निवेदनाद्वारे केल्या.अनेक शिक्षक वारंवार निघणाऱ्या वैद्यकीय बिलातील त्रुटींसाठी व भेदभाव करून मंजूर होणाऱ्या देयकाबाबत त्रासलेले आहेत. आकस्मिक कारणासाठी काढत असलेली जी.पी.एफ. कर्ज प्रकरणे काम होईपर्यंतही मंजूर केली जात नाहीत. उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचा घोळ कायम आहे. वार्षिक बदल्या चार वर्षांपासून झाल्या नसल्याने कुटुंबापासून दूर राहत असलेले शिक्षक वैतागले आहेत, अशी टीका यावेळी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्त्व जिल्हाध्यक्ष विजय भोगेकर, सरचिटणीस हरीश ससनकर, जिल्हा नेते नारायण आर. कांबळे, राज्य सल्लागार आर. जी. भानारकर यांनी केले. या आंदोलनात दीपक वऱ्हेकर, महिला मंच अध्यक्ष अलका ठाकरे, कार्याध्यक्ष सनिता इटनकर, सचिव शालिनी देशपांडे, किशोर आनंदवार, सायराबानो खान, मिनाक्षी बावनकर राजेश दरेकर, ओम साळवे, दिलीप इटनकर, पी. टी. राठोड, हेमंत वाग्दरकर, प्रतिभा उदापुरे, प्रभाकर भालतडक, सुनिता चल्लावार, अर्चना येरणे, पुंडलिक उरकुडे, वैशाली दीक्षित, वंदना खाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)