शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुतार समाजावरील अन्याय दूर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:57 IST

सुतार समाजावरील अन्याय दूर करु, असे आश्वासन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सुतार समाजबांधवांना दिले. पीडित श्रीकृष्ण ओरीवकर व त्यांची पत्नी सुनिता ओरीवकर रा. हिवरखेड, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला या सुतार समाजाच्या एका गरीब दाम्पत्याला, आकोट वन विभागाचे डीएफओ गुरुप्रसाद बिहारी,.............

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आश्वासन : समाजबांधवांनी दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सुतार समाजावरील अन्याय दूर करु, असे आश्वासन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सुतार समाजबांधवांना दिले.पीडित श्रीकृष्ण ओरीवकर व त्यांची पत्नी सुनिता ओरीवकर रा. हिवरखेड, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला या सुतार समाजाच्या एका गरीब दाम्पत्याला, आकोट वन विभागाचे डीएफओ गुरुप्रसाद बिहारी, दोन वनपरिक्षेत्र अधिकारी के. एस. पाटील, आरएफओ वनपरिक्षेत्र अचलपूर, जिल्हा अमरावती, प्रविण पाटील आरएफओ सुमठाणा रेंज, जि. अमरावती आणि त्यांचे तीन सहकारी वनरक्षक साबळे, तायडे, ए. व्ही. राठोड यांनी अवैध लाकूड तपासणीच्या बेकायदेशिर धाडसत्राच्या नावाखाली आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करुन अमानुष मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ संबंधित वनाधिकाऱ्यांवर व कर्मचाºयांवर निलंबनाची कार्यवाही करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी सुतार समाजाने केली आहे. आमदार डॉ. संजय रायमूूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्टÑातील सुतार समाजाच्या वतीने प्रदीप जानवे, प्रा. विजय रायमल, संजय भालेराव, विजय गवळे, श्रीकृष्ण ओरीवकर आणि इतर सुतार समाज बांधवांनी मंगळवारी मुंबई येथील मंत्रालयात जाऊन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर निवेदन दिले.वनमंत्री मुनगंटीवार यांनी सदर प्रकरणाची माहिती जाणून घेत सुतार समाजाच्या या अतिसंवेदनशील प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आठ दिवसात सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश संबंधित वन सचिव व कक्षाधिकारी यांना दिले व आपल्या कर्तव्यदक्षपणाचा प्रत्यय दिला. ना. मुनगंटीवार एवढ्यावरच थांबले नाही तर या प्रकरणात चौकशीअंती संबंधित वन अधिकारी आणि वन कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर तातडीने निष्पक्षपणे योग्य ती कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासनही सुतार समाजबांधवांना दिले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार