शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार वर्षांपूर्वीचे अवशेष आढळले

By admin | Updated: April 24, 2017 01:02 IST

तालुक्यात येणाऱ्या डोंगरगाव येथील डोंगराच्या पायथ्याशी दोन हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे अवशेष सापडत आहेत.

डोंगरगाव शेतशिवार : सातवाहन काळातील अवशेषगोंडपिपरी : तालुक्यात येणाऱ्या डोंगरगाव येथील डोंगराच्या पायथ्याशी दोन हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे अवशेष सापडत आहेत. त्यामध्ये मातीपासून तयार करण्यात आलेली भांडी, मनी, कोरीव दगड, उकर, तांब्याच्या वस्तू आदींचा समावेश आहे. डोंगरगाव परिसरात दोन हजार वर्षापूर्वी सातवाहनाचे साम्राज्य असावे, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात येणारा गोंडपिपरी तालुका सीमावर्ती भागात आहे. या तालुक्यातील शिवनी गावाजवळ वैनगंगा व वर्धा या दोन नद्यांचा संगम आहे. नांदगाव, चिवंडा येथे आठव्या ते नवव्या शतकातील मंदिराचे अवशेष विखुरलेले आहेत. कुळेनांदगाव चिवंडाप्रमाणेच आता डोंगरगावाच्या शेतशिवारात शेतात नांगरताना प्राचीन संस्कृतीचे अवशेष आढळत आहेत. गोंडपिपरी व लगतच्या पोंभुर्णा तालुक्यात प्राचीन काळातील अवशेष मोठ्या प्रमाणात आहेत. खोदकामात मातीपासून तयार केलेले घरगुती वापरात येणाऱ्या भांड्यांचे तुकडे, दगडी हत्यार, भल्या मोठ्या दगडात उकर, मातीपासून बनविलेले आभूषण, तांब्याचे साहित्य, कोरीव दगड, मातीपासून तयार केलेल्या शिल्पाकृती यांचा समावेश आहे. सापडणाऱ्या वस्तू भद्रावती तालुक्यात येणाऱ्या चंदनखेडा येथील उत्खननात सापडलेल्या वस्तुशी साम्य असल्याने त्या सातवाहन काळातील असल्याचा अंदाज ऐतिहासीक वारसा संवर्धन समितीचे अध्यक्ष अरुण झगडकर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, डोंगर गावापासून जवळच असलेल्या शिवनी संगमात सम्राट अशोक काळातील अवशेष सापडले आहेत. भंगाराम तळोधी येथे गोंड, भोसलेकालीन मंदिराचे अवशेष आहेत. गोंडपिपरी तालुक्याला लागूनच असलेल्या पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ देवई या गावात प्राचीन मंदिराचे अवशेष आहेत. या भागाचे उत्खनन झाल्यास हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेल्या संस्कृतीचा इतिहासावर प्रकाश पडू शकेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)