शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स जीओवर अंकुश

By admin | Updated: July 17, 2014 23:58 IST

रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. कंपनीला चंद्रपुरात भूमिगत केबल टाकणे व टॉवर्स उभारण्यासाठी मनपाने दिलेल्या परवानगीला मनपाच्याच नगरसेवकांनी कडाडून विरोध केला.

आयुक्तांनी काम थांबविले : सात बाबींवर मागितले स्पष्टीकरणचंद्रपूर : रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. कंपनीला चंद्रपुरात भूमिगत केबल टाकणे व टॉवर्स उभारण्यासाठी मनपाने दिलेल्या परवानगीला मनपाच्याच नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. नागरिक व एनजीओंनीही याला समर्थन दिले. याची दखल घेत महानगरपालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी अखेर रिलायन्स जीओच्या बांधकामावर अंकूश लावला आहे. यासोबतच कंपनीकडून सात बाबींवर स्पष्टीकरणही मागितले आहे. त्यामुळे रिलायन्स जीओचा मुद्दा आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे.रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. चे विदर्भ प्रमुख अनुराग वर्मा यांच्या नावाने आयुक्त सुधीर शंभरकर यांनी सदर आदेश जारी केले आहेत. या आदेशात कंपनीच्या कामाला दोन भागात विभाजित केले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर खोदकाम करून केबल टाकणे व शहरात टॉवर्स उभारणे, असे हे विभाजन आहे. सध्या महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची बांधकामे झालेली आहे. तब्बल तीन वर्षानंतर चंद्रपूरकरांना चांगले रस्ते मिळणे सुरू झाले आहे. रिलायन्स जीओच्या खोदकामामुळे हे रस्ते पुन्हा फुटणार आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे, असेही आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. याशिवाय शहरात शंभर टॉवर्स उभारल्यास टॉवरमुळे होणाऱ्या रेडीएशनचा अनिष्ट परिणाम सर्व जिवितांवर होण्याची भीती नागरिक व सामाजिक संघटना व्यक्त करीत आाहेत. ३० जून रोजी मनपाच्या आमसभेत या मुद्यावर साधक-बाधक चर्चाही झाली आहे. या पार्श्वभूमिवर आयुक्तांनी रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. कंपनीकडून सात बाबींवर स्पष्टीकरण मागितले आहे. आयुक्तांनी या आदेशाची प्रतिलिपी प्रधान सचिव, नगर विकास विभाग व जिल्हाधिकारी यांनाही पाठविल्या आहे. (शहर प्रतिनिधी)