शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडा

By admin | Updated: August 4, 2015 00:40 IST

खरीप हंगामाला सुरूवात झाली असता जुनमध्ये आलेल्या पावसामुळे सावली तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली.

आढावा बैठक : विजय वडेट्टीवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देशसावली : खरीप हंगामाला सुरूवात झाली असता जुनमध्ये आलेल्या पावसामुळे सावली तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु, त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना आता पाण्याची नितांत आवश्यकता असल्याने वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेचे चारही पंप सुरू करून येत्या महिनाभरात शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्या, अशी सूचना माजी राज्यमंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी सावली तालुक्यातील वाघोली बुटी येथे घेतलेल्या सिंचन विभागाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना केली.आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुंबई येथील अधिवेशनाचे कामकाज सोडून गेल्या तीन दिवसांपासून सावली तालुक्यातील अनेक गावांचा दौरा केला. पावसाअभावी शेतातील धानाचे पऱ्हे सुकू लागले असून ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी धानासोबतच सोयाबीन, तूर यासह अनेक पिकांची वाईट परिस्थिती आहे. सदर दौऱ्यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी पाण्याबाबत आपली व्यथा मांंडली. त्यामुळे वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेच्या चारही पंपाद्वारे चार हजार हेक्टर शेतीचे सिंचन होणार असल्याने सर्व नहर, कालव्यांची युद्धपातळीवर यंत्रणेच्या साहाय्याने दुरुस्ती करावी. पाणी कुठेही अडणार नाही, याची काळजी घेऊन सर्व शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, यात कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा न करता महिनाभराच्या आत वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेचे चारही पंप सुरू करून त्याद्वारे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. सर्व शेतकऱ्यांना शेतीसाठी लवकरच वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेच्या चारही पंंपाद्वारे पाणी उपलब्ध होणार असून सिंचन विभागातील यांत्रिकी विभाग, लघुपाटबंधारे विभाग, मध्यम पाटबंंधारे विभाग यासह गोसखुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची बैठक सावली तालुक्यातील वाघोली बुटी येथील उपसा सिंचन विभागाच्या कार्यालयात आमदार विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता आत्रामम, गोसेखुर्द प्रकल्प आसोला मेंढा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सोनवणे, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता भाके यांच्यासह उपविभागीय अभियंता उपस्थित होते.या बैठकीत अधिकाऱ्यांनी आसोलामेंढा तलावात उपलब्ध असलेल्या पाण्यासह वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेविषयी माहिती दिली. या बैठकीला जलसंपदा विभाग तसेच अन्य विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)