शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्टअखेर गोसीखुर्दचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:10 IST

गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पºहे सुकू लागले आहे. पावसाअभावी शेतकºयांचे रोवणे खोळंबल्यामुळे शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देअन्यथा तीव्र आंदोलन : विजय वडेट्टीवार यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पºहे सुकू लागले आहे. पावसाअभावी शेतकºयांचे रोवणे खोळंबल्यामुळे शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शेतकºयांना वरदान ठरणाºया गोसीखुर्द प्रकल्पात पाण्याचा भरपूर साठा असतानाही वेळेवर शेतकºयांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे येत्या ३० आॅगस्टपर्यंत गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, ब्रह्मपुरी, सिंदेवाही आणि सावली तालुक्यातील सर्व शेतकºयांना तातडीने पाणी उपलब्ध करुन द्यावे आणि त्यांची पिके वाचवावी, अन्यथा नागपूर विदर्भ पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालक यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.यावर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडल्याने ब्रह्यपुरी, सिंदेवाही, सावली, नागभीड, चिमूर, मूल या तालुक्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांनी महागडे बि-बियाणे घेऊन धान, सोयाबीन, तूर, कापूस या महत्वाच्या पिकासह इतरही पकांची पेरणी केली. त्यात सावली तालुक्यात २४ हजार ९१४ हेक्टर, ब्रह्मपुरी तालुक्यात २८ हजार ९० हेक्टर, सिंदेवाही तालुक्यात १८ हजार ७२५ हेक्टर या तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यात १ लाख ७७ हजार २६५ हेक्टरमध्ये धानपिकाची लागवड करण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्ह्यात १ लाख ४० हजार ३८८ हेक्टरमध्ये सोयाबिन, १ लाख ६४ हजार ५९५ हेक्टरमध्ये कापूस, ३४ हजार ७०६ हेक्टरमध्ये तूर, या पिकासह मूंग, उडीद, चवळी, वाल, बरबटी, तिळ, मिरची, हळद या पिकांची पेरणी करण्यात आली. हवामान खात्यानेसुद्धा यंदा चांगला पाऊस पडेल, असे भाकीत वर्तविले असल्यामुळे श्ेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दगा दिल्याने ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, नागभीड, चिमूर, मूल या तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व पिके करपू लागली आहे. पावसाळी अधिवेशन संपताच मागील चार दिवसांपासून ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली या तालुक्यात दौरा करुन प्रत्यक्ष शेतकºयांच्या शेतावर जावून पाहणी केली असता पिकांची बिकट परिस्थिती दिसून आली. पाण्याअभावी पिके करपू लागली आहे. तर जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. येत्या चार- पाच दिवसात पाऊस आला नाही तर शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. असे असतानासुद्धा सिंचन विभागाचे अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, असेही आ. वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता आणि कार्यकारी संचालक यांना दूरध्वनीवरुन तातडीने गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी तातडीने सोडण्यात यावे. शेतकºयांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. येत्या ३० आॅगस्टपर्यंत गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावात सोडून ब्रह्मपुरी, सावली आणि सिंदेवाही तालुक्यातील शेतकºयांना उपलब्ध करुन दिले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आ. विजय वडेट्टीवार यांनीदिला आहे.