शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर चुकविणाऱ्यांवर कसणार लगाम

By admin | Updated: August 6, 2014 23:44 IST

चंद्रपूरची लोकसंख्या अलिकडे झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठाही वाढल्या आहे. निवासी इमारतींचे व्यावसायिक इमारतींमध्ये रुपांतर झाले आहे. मात्र मनपाच्या कागदावर

हालचालींना वेग : नागरिकांच्या संपत्तीचे होणार फेरमूल्यांकनचंद्रपूर : चंद्रपूरची लोकसंख्या अलिकडे झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठाही वाढल्या आहे. निवासी इमारतींचे व्यावसायिक इमारतींमध्ये रुपांतर झाले आहे. मात्र मनपाच्या कागदावर या इमारती निवासीच आहे. आता कर चुकविणाऱ्यांविरुध्द मनपाने मोहीमच आरंभली असून नागरिकांच्या संपत्तीचे फेरमूल्यांकन होणार आहे. यासाठी पुन्हा कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण केले जाणार आहे.अलिकडच्या काळात चंद्रपूर शहरात अनेक बदल घडून आले आहेत. औद्योगिक जिल्हा असल्याने चंद्रपूर शहराचे महत्त्व वाढले आहे. याशिवाय शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. सहाजिकच व्यापारीकरणही वाढले आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी आपल्या निवासी इमारतींमध्ये फेरबदल करीत येथे व्यापारी प्रतिष्ठाने काढली आहे. इमारतींमध्ये व्यापारी प्रतिष्ठाने असली की या इमारतींचे व्यावसायिक इमारतींमध्ये रुपांतरण होते. अशा इमारतींचा महानगरपालिकेकडे जो रेकॉर्ड असतो, त्यातही बदल केला जाणे अपेक्षित आहे. त्यानुसार गृहकर आकारला जातो. सहाजिकच निवासी इमारतींपेक्षा व्यावसायिक इमारतींसाठी जास्त कर आकारला जातो. मात्र हा कर वाचविण्यासाठी नागरिकांकडून मनपा कर्मचाऱ्यांची मनधरणी केली जात आहे. यातून पुढे अर्थकारणही होत असल्याचे शंका आहे. याचाच परिणाम म्हणून मनपाच्या रेकॉर्डवर शहरातील अनेक अशा इमारती व्यावसायिक इमारतीत रुपांतरित होऊ शकल्या नाही. त्यामुळे अशा इमारतीचे मालक निवासी इमारतींचाच कर भरीत होते. याशिवाय एखाद्या इमारतीत भाडेकरू राहत असेल तर त्याच्या भाड्याच्या तुलनेत मनपाकडून कर आकारला जातो. मात्र मनपाजवळच्या कागदपत्रात अनेक इमारतींमध्ये भाडेकरू असतानाही दाखविले जात नाही. या कर चुकवेगिरीमुळे दरवर्षी मनपाला कोट्यवधींचा फटका बसत होता.दरम्यान मागील महिन्यात शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टर कुबेर कोतपल्लीवार यांच्या व्यावसायिक इमारतीसाठी परवानगी देताना कर चोरीला पाठबळ देण्याचा आरोप ठेवून मनपातील प्रभारी कर पर्यवेक्षक ए.एम.बेग यांना त्यांनी तडकाफडकी निलंबित केले होते. यामुळे मनपात खळबळ उडाली होती. शहरात असे अनेक प्रकार होत असल्याची शंका असल्याने आता मनपाचे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी या करचुकवेगिरीवर अंकूश लावण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांवर थेट कारवाई नको म्हणून नागरिकांच्या संपत्तीचे फेरमुल्यांकन केले जाणार आहे. यासाठी महानगरपालिकेतील कर विभागातील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात येणार असून या पथकाद्वारे शहरातील इमारतींचे पुन्हा सर्वेक्षण केले जाणार आहे. या कामात पुन्हा कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात मनपाचे आयुक्त सुधीर शंभरकर यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (शहर प्रतिनिधी)