शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

खासगी कामासाठी नदीतील पाण्याचा सर्रास वापर

By admin | Updated: April 21, 2015 01:01 IST

दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत आहे. उमा नदीवरील असलेल्या पाण्याच्या पात्रात घट होत असताना मात्र तालुका

मूल : दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत आहे. उमा नदीवरील असलेल्या पाण्याच्या पात्रात घट होत असताना मात्र तालुका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे खासगी कामासाठी इंजिनद्वारे नदीचे पाणी टँकरमध्ये भरून नेले जात आहे. पाण्याची पातळी खालावत असल्याने गुराढोरांना पाणी मिळणे कठीण होत असताना खाजगी कामासाठी होणारा पाण्याचा वापर त्वरित बंद करावा, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष अतुल गोवर्धन, उपाध्यक्ष गणेश पुण्यप्रेडीवार व शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तालुका प्रशासनाला दिला आहे.एप्रिल-मे महिन्यात दरवर्षी नदीवरील पाण्याची पातळी घटत असते. त्यामुळे नदीजवळील शेतकऱ्यांनी पाणी शेतीसाठी वापरू नये यासाठी शासन स्तरावरून कडक पाऊले उचलली जातात. पाण्याची पातळी घटल्याने दररोज नदीवर येणाऱ्या गुराढोरांना पाणी मिळणे कठीण होत असते. यासाठी तालुका प्रशासनाकडून दरवर्षी नदीजवळील शेतकऱ्यांना नोटीस बजावून नदीतील पाणी न घेण्याची तंबी दिली जाते. मात्र शेतकऱ्यांपेक्षा खासगी काम करणारे कंत्राटदार उमा नदीवरील पाणी ट्रक व ट्रॅक्टरवर सर्रासपणे दिवस-रात्र नेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नदीतील पाण्याची पातळी खालावत असताना खासगी कामासाठी पाणी वापरणे कितपत योग्य असल्याचा प्रश्न मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. कंत्राटदारांनी कामासाठी खासगी विहिरी वा इतर मार्गातून पाणी वापरावे. मात्र नद्यासारख्या नैसर्गिक स्रोतातील पाणी वापरू नये. गुराढोरांना पाण्यासाठी भटकण्याची पाळी येऊ शकते. यासाठी तहसीलदार यांनी त्वरित लक्ष घालून नदीतून होणारी पाण्याची वाहतूक बंद करावी. या उप्परही ते ऐकत नसल्यास कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी मनसेचे मूल तालुकाध्यक्ष अतुल गोवर्धन, गणेश पुण्यप्रेडीवार यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)