शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख दहा हजारांचा नियमबाहय खर्च

By admin | Updated: June 19, 2014 23:44 IST

भद्रावती तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायतीत अनागोंदी कारभार सुरू असून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप माजी सरपंच विलास पडवे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रमोद खिरटकर यांंनी केला होता.

आष्टा ग्रामपंचायत : चौकशीत सरपंच व सचिव आढळले दोषी; अधिकाऱ्यांकडून कारवाईसाठी टाळाटाळचंदनखेडा : भद्रावती तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायतीत अनागोंदी कारभार सुरू असून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप माजी सरपंच विलास पडवे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रमोद खिरटकर यांंनी केला होता. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात एक लाख १० हजार ६९ रुपयांचा नियमबाहय खर्च करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून यात सरपंच आणि सचिव दोषी आढळून आल्याचा उल्लेख चौकशी अहवालात करण्यात आला आहे.आष्टा गावाला सन २००९-१० या वर्षांचे तीन लाख रुपये पारितोषिकाच्या माध्यमातून प्राप्त झाले होते. त्याचा विनियोग करताना ग्रामसभेला व तंटामुक्त समितीला विश्वासात न घेता सरपंच व सचिव स्वत:च्या मर्जीने निकषाला बगल देत रक्कम खर्च करीत होते. तसेच शासकीय मालमत्तेचा गैरवापर, महात्मा गांधी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार, रस्त्याचे बांधकाम व ग्रामीण पाणी पुरवठा व योजनेतील भ्रष्टाचार, महिला व बालकल्याणासाठी करण्यात आलेली १० टक्के खर्चाची खोटी बिले जोडणे, तहकूब ग्रामसभेत कराची वाढ करणे याविरुद्ध माजी सरपंच विलास पडवे व तंमुस अध्यक्ष प्रमोद खिरटकर यांनी ६ जानेवारीला तक्रार केली. याचा ‘लोकमत’ ने पाठपुरावा केला. यासंदर्भात भद्रावती पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी प्रकाश मानकर यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत ग्रामपंचायतीने १५ आॅगस्ट २०११ च्या ग्रामसभेत ठराव क्र. ६ नुसार पारितोषिकाच्या रकमेतून खर्च करण्याबाबतचे नियोजन केले व ७३ हजार ८३५ रुपयांचा खर्च केल्याचे आढळले. मात्र उर्वरित दोन लाख २६ हजार १६५ रुपयांऐवजी केवळ एक लाख १६ हजार ९६ रुपये सामान्य निधीत शिल्लक आढळले.त्यावरुन १ लाख १० हजार ६९ रुपये नियमबाहय खर्च झाल्याचे स्पष्ट झाले. पारितोषिकाची रक्कम निकषाप्रमाणे खर्च न करता पंचायत समितीच्या इतर कामावर खर्च केल्याचे निदर्शनास आले आल्याचे अहवालात म्हटले आहे. परंतु त्याचा बाबनिहाय खर्च दर्शविण्यात आलेला नाही. यावरुन चौकशी अधिकाऱ्यांनी दोषींना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते, असा आरोप विलास पडवे यांनी केला आहे.त्याच प्रमाणे महात्मा गांधी महाराष्ट रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीने ३० सिमेंट पाईप खरेदी केले. त्यातील एक पाईप शंकर विठोबा पडवे यांच्या शेतात नऊ महिन्यापासून पडून असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. याबाबत पंचायत समितीकडे तक्रार केल्यानंतर कारवाई करण्यात आली. यावरुन सचिव व संबंधित शेतकऱ्यांमध्ये खरेदी- विक्रीचा व्यवहार झाल्याची शंका येते. परंतु यावर कोणतेही ताशेरे ओढलेले नाही. एमआरइीिएस अंतर्गत चार पांदण रस्त्याचे कामात एकाच कालावधीत एकाच व्यक्तीची दोन मस्टरवर नावे होती. परंतु या चौकशीला तीन महिन्यांचा विलंब करून झालेल्या चुकांमध्ये दुरुस्ती करण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सचिवाला संधी दिली. त्यामुळे अहवालात यावर दोषी न आढळल्याचे म्हटले आहे. कोरम पूर्ण न झाल्यास तहकुब ग्रामसभेत कर वाढविण्याचा ठराव पारित करून घेण्यात आला आहे. असा महत्वाचा ठराव तहकुब सभेत घेता येतो का? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.एकंदरीत सदर चौकशी एकांगी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. सचिव एम.एन.वांंढरे, ग्रामविकास अधिकारी व सरपंच मरापे यांच्याविरुद्ध कारवाईसाठी विलंब होत असल्याने संशयाचे वातारण निर्माण झाले आहे. (वार्ताहर)